महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे. या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शैक्षणिक वर्ष सन 2022-23. हे दि. 23 फेब्रुवारी ते एक मार्च 2023 या कालावधीत होत असून शिबिराचा दुसरा दिवस आणि व्याख्यानाचा पहिला दिवस. दि. 24 रोजी व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. विजय शिंदे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
‘साहित्य आनंदाचा राजमार्ग’ या विषयावर बोलताना त्यांनी माणदेश म्हणजे माण नदीच्या उगमापासून ते शेवटापर्यंत तिच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे, तो प्रदेश म्हणजेच माणदेश. आणि याच माणदेशातील साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. माडगूळकर बंधू तसेच ना. स. इनामदार, शंकरराव खरात, शांताबाई कांबळे या आणि अशा अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी आपलं योगदान देण्याचं काम केल्याचं आपल्या लक्षात येतं माडगूळकर बंधू यांनी तर माणदेशाची वेगळी ओळख मराठी साहित्यामध्ये निर्माण करण्याचे काम केलेले आहे.
व्यंकटेश तात्या माडगूळकर यांची बनगरवाडी, माणदेशी माणसं ह्या कलाकृती मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरल्या आहेत. तसेच गदिमांनी तर ‘गीतरामायण ‘सारखा काव्य निर्माण करून आपले नाव मराठी साहित्यामध्ये अजरामर करण्याचे काम केल्याचे दिसून येतं. साहित्य म्हणजे तरी काय? तर साहित्य म्हणजे समाजाचे प्रतिबिंब असते.
आज आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी अनेक शक्तीस्थाने निर्माण झाली आहेत. त्यामध्ये फेसबुक असेल व्हाट्सअप ट्वीटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम या सगळ्यांचा समावेश होतो. फक्त हाय- बाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट यामध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीने यातून बाहेर पडून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा.
आपण तर सुशिक्षित आहोत. अशिक्षित असणारी बहिणाबाई चौधरीनी जीवनाचे सार तिच्या कवितांमध्ये सामावल्याचे आपल्या लक्षात येते प्रा. शिंदे यांनी काही कविता गाऊन दाखवल्या तर काही विनोद सांगून खूप हसून ठेवलं पण व्याख्यानाचा समारोप करत असताना खूप भावनिक करून हसवता हसवता रडवले. त्यांनी सांगितले की साहित्य लिहिणाऱ्याला आपल्या भावना जगासमोर मांडल्याचा आनंद होतो तर वाचणार्यांना ते साहित्य वाचल्यानंतर आनंद मिळतो.
आनंद हे साहित्याचे सर्वात महत्त्वाचे प्रयोजन आहे त्यानंतर जानुबाई विद्यालय विरळीचे मुख्याध्यापक के. के. माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपण समाजात वावरत असताना आपण सेवक आहोत या भावनेने वागल्यास समाजाचा उद्धार होण्यासाठी मदत होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही प्रा. व्ही. ए. खिलारी यांनी केले. तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एच. पाटील यांनी केले तर आभार प्रा. डी. एस. देवकुळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विरळी गावच्या सरपंच नीलमताई घुटुकडे, संस्थेचे संचालक, यु.सी. नलवडे,पी.डी काशीद,डॉ. सी. एस .गोरड,बी. जी. नलवडे, हणमंत घुटुकडे,प्रा. एन. डी. पाटील, प्रा. समीर मुलाणी, प्रा. एम. एस. शिंगाडे, प्रा. सौ. आर. व्ही. काळेल, प्रा. एस. के वाघमोडे, श्री. जे.जे. फकीर श्री. एम.पी. नरळे तसेच विद्यार्थी आणि विरळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







