मुस्लिम समाजाची करगणी येथील बरीच वर्षे प्रलंबित प्रमुख मागणी अखेर निकाली…
मौजे करगणी ता आटपाडी येथील मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन त्यांच्या मागणी नुसार मुस्लिम समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ जयंतराव पाटील साहेब, युवा नेते वैभव दादा पाटील, युवक प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे आणि युवा नेते उमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दफनभूमीसाठी १ एकर(४० गुंठे) जागेचा महसूल विभागाकडून ७/१२ मिळवून आणण्यात यश आले आहे. यामुळे गेली बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या हा प्रश्न निकाली काढणे शक्य झाले आहे.
या प्रमुख मागणीमुळे शिष्ट मंडळ सहित मुस्लिम बांधवांना सोबत घेत आटपाडी तालुक्यातील दोन धनगर समाजातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत म्हणजेच विभूतवाडी ता आटपाडी चे मूळ रहिवाशी युवक राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रा नारायण खरजे व करगणी गावचे युवा नेते उमेश पाटील यांनी सामाजिक ऐक्य साधून पुढाकार घेऊन हा मुख्य प्रश्न २ ते ३ वर्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर निकाली काढल्याने संपूर्ण मुस्लिम बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी विविध मुस्लिम बांधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी, तालुका प्रशासन, गावपातळीवरील अधिकारी आदी सर्व समाजबांधव यांच्याकडे पाठपुरावा करून समाजाच्या प्रश्न निकाली काढून एक पाऊल फक्त आणि फक्त समाजासाठी हे सिद्ध केले आणि 50 वर्षांचा मुस्लिम दफन भूमीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लावला.
…यामध्ये नवाज जमादार, मोदीभाई इनामदार, बरकत ( बडू ) शेख , हबीब पठाण , शाहरुख पठाण, फिरोज मुल्ला, कै.जावेद मुल्ला , मोहसीन मुल्ला, यासीन इनामदार, बालेखान मुलाणी, इरफान इनामदार, महंमद पठाण, खालिद जमादार , यासीन जमादार , जमीर पठाण , छोट्या इनामदार , जहांगीर पठाण , समीर इनामदार , रियाज मुल्ला , शब्बीर जमादार , शोएब मुलाणी , फारुख जमादार , शाहिद जमादार, शाहिद पठाण,समीर इनामदार, भारत पाटील ,निलेश कांबळे , विनय बंडगर , उत्तम माने ( ग्रा.पं सदस्य ) ,श्रीधर खिलारी ( ग्रा.पं सदस्य ), महेश पाटील ( MP) , चिकू पांढरे, महेश सरगर , वैभव गेंड , मिलिंद मंडले, समस्त मुस्लिम समाज बांधव व ग्रामस्थ, करगणी….







