झरे महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा
आटपाडी तालु्यातील झरे येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे.पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालयात दि. 8 मार्च 2023 रोजी महिला दिनानिमित्त 21 व्या शतकतील बदलते स्त्रीजीवन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी व्याख्यात्या म्हणून डॉ. सुजाता देशमुख (श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, आर. एच. पाटील होते.
बोलताना डॉ.सुजाता देशमुख म्हणाल्या की महिलांना आपल्या हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. कधी कधी हक्क हे सहज मिळत नाहीत तर ते मिळवावे लागतात. किंवा हिसकावून घ्यावे लागतात. आज संपूर्ण जगामध्ये हा दिवस महिला दिन म्हणून साजरा होत असताना त्याचे स्वरूप कसे आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. रशियामध्ये महिलांना संपूर्ण दिवस सुट्टी दिली जाते, तसेच पूर्ण देशभर फुलांची खूप खूप मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.
चीनमध्ये महिलांना आर्धा दिवस सुट्टी दिली जाते. तर अमेरिकेमध्ये संपूर्ण मार्च महिना ‘वुमन्स हिस्टरी ऑफ मंथ’ म्हणून साजरा केला जातो. आणि भारतीय महिला ह्या रानात कष्ट करत असतात त्यांना हा दिवस बऱ्याच अंशी माहीत सुद्धा नसतो. अफगाणिस्तान सारख्या देशाचा विचार केला तर या देशांमध्ये आजही महिलांना शिक्षण नोकरी नाकारले जाते. तसेच एखादा पुरुष बरोबर नसेल तर प्रवास सुद्धा नाकारला जातो. म्हणजेच काय तर अजून महिलांकडे ज्या दृष्टीने बघायला हवं त्या दृष्टीने बघितलं जात नाही. ही एक जागतिक शोकांतिका म्हणावी लागेल
तसेच म्हणून बोलताना प्राचार्य म्हणाले की घराचे पावित्र्य, मांगल्य, अस्तित्व, टिकवण्याचं महत्त्वाचं काम स्त्री करत असते. भारतात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यामुळेच स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली. त्याचबरोबर वय,रंग,रूप, किंवा साधने यापेक्षा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. महिलांनी लता भगवान करे या महिलेने ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने 65 व्या वर्षी मॅरेथॉन जिंकून आपल्या आत्मविश्वासाची जाणीव करून दिली. तिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. माया माने यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सौ. रेश्मा काळेल, यांनी केले. आभार प्रा. देवेंद्र देवकुळे यांनी मानले. तरी या कार्यक्रमासाठी प्रा. व्ही. ए. खिलारी, प्रा. एम. एस. शिंगांडे,प्रा. एम. डी. खांडेकर,प्रा. एन.डी.पाटील, प्रा. एस. के.वाघमोडे प्रा. एस.डी.मुलाणी,प्रा. आर. एच. चौगुले, श्री.जे.जे.फकीर, श्री. एम. पी. नरळे, श्री.दत्ता सुळे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.







