आटपाडी तील दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प विक्रेत्याकडून जादा पैश्याची आकारणी
आटपाडी येथे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प विक्रेते कडून ग्राहकांची लूट होत असल्या बाबद महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
स्टॅम्प विक्रीच्या कामामध्ये होणाऱ्या सर्वसामान्य जनतेची लूट थांबली नाहीत तर मनसे आंदोलन छेडणार असल्याचा सांगण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड, विभागाध्यक्ष अभिजीत सरगर, वाहतूक तालुकाध्यक्ष मारुती( दाजी) खिल्लारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







