• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……

माणगंगा by माणगंगा
July 29, 2021
in सामाजिक
0
माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……

माण जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू

माण ;

                       कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी सौ. मनिषा विश्वनाथ शिंदे यांनी राबवलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथ. शाळा वायरलेसफाटाची इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी कु. श्रेया शरद जाधव हिच्या घरी बारववस्ती वायरलेस फाटा येथे दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. नवनाथ वणवे साहेब यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा परिषद पुणे येथील शिक्षण विस्ताराधिकारी मा.श्री. गोरक्षनाथ हिंगणे साहेब , बेटवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. शिवाजी गोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडले.

                           सदर उद्घाटन कार्यक्रमासाठी विद्यार्थिनीच्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच फुग्यांची सजावट करण्यात आली होती. मान्यवरांचे स्वागत कु.श्रेया हिने गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून केले. घरातील शाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी मा. श्री. वणवे साहेब यांनी रिबिन कापून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन गार शाळेचे मुख्याधापक श्री. बबन शेलार यांनी केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा शिंदे यांनी उपस्थितांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्व विद्यार्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थाच्या घरीच स्वतंत्र शाळा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याचा मोफत संच देण्यात आला आहे.

           जि. प.प्राथ.शाळा वडगाव ता. माण जि. सातारा येथील मुख्याध्यापक श्री.संजय लक्ष्मण खरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या घरोघरी शाळाउपक्रमामुळे विद्यार्थी अव्याहतपणे शिक्षण घेऊ शकतो. पालक व शिक्षक यांच्या समन्वयातून  विद्यार्थ्याची प्रगती आनंदाने व गतीने होण्यास मदत होते. सर्व पालकांचा या उपक्रमास खूप प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

    सदर कार्यक्रमास श्री. कुंभार व श्री. पठण विषय साधन व्यक्ती BRC दौंड, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, गोपाळवाडी केंद्रातील उपशिक्षिका सौ. दरेकर व सौ. मेमाणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संजय साबळे इ. मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सौ. शिंदे मॅडम व श्री. कुलांगे सर यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वायरलेसफाटा शाळेचे उपशिक्षक श्री. अमोल कुलांगे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
Views: 425
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!

चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)