• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.

माणगंगा by माणगंगा
July 29, 2021
in सामाजिक
0
कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात.  विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.

कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात.

    विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा. 

ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज ता. कराड जि. सातारा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. मनिषा रामुगडे मॅडम यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सातारा सदस्या मा. सौ. विनिता पलंगे मॅडम व उंब्रज गावचे सरपंच मा. श्री. योगीराज जाधव यांच्या शुभहस्ते तसेच कराड पंचायत समिती सदस्या मा. सौ. सुषमा डांगे मॅडम ,अजय गोरड साहेब पोलीस उपनिरीक्षक उंब्रज ,पंचायत समिती कराडच्या शिक्षण विस्ताराधिकारी सौ. जमिला मुलाणी मॅडम , उंब्रज केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री. हणमंत काटे साहेब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मा. सौ. अलका माळी मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. निलेश माने , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सचिन डुबल तसेच घरोघरी शाळेचे निर्माते श्री. संजय खरात सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडले.

माण तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांची संकल्पना असलेल्या घरोघरी शाळा हा उपक्रम सौ. मनिषा रामुगडे मॅडम यांनी उंब्रज मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचा संच मोफत दिला आहे. नियमित गृहभेटीद्वारे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य हाती घेतले आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी कु.अनुष्का गायकवाड या विद्यार्थिनीच्या घरी सदर उद्घाटन सोहळा पार पडला

. त्यासाठी विद्यार्थिनीच्या घरासमोर फुग्यांची आकर्षक कमान केली होती., दारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये विविध तक्ते लावण्याबरोबरच फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मान्यवरांचे आगमन होताच अनुष्का गायकवाड या विद्यार्थिनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. केंद्रप्रमुख हणमंत काटे साहेब यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.सदर उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निलम पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कोरोना संकटामुळे सुमारे दिड वर्ष शाळा बंद असल्याने शाळे पासून दूर असलेल्या चिमुकलीच्या प्रत्यक्ष घरातच शाळा अवतरल्यामुळे कु. अनुष्का गायकवाड ही चिमुकली खूप खुश झाली होती. तिने उपस्थितांना मोठ्या आनंदाने घरातील सर्व तक्त्यांचे वाचन करून दाखवले व मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन मान्यवरांची मने जिंकली .
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना उपक्रमाचे खूप कौतुक केले. या उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, सर्व विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणामध्ये आनंददायी पद्धतीने शिक्षण मिळेल अशा भावना व्यक्त करून उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


श्रीम.शबनम मुजावर मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड यांनी सदर कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती दर्शवून विद्यार्थी व पालकांची हितगूज करून उपक्रमाविषयी माहिती घेऊन सदर उपक्रमाचा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास मा. श्री.संग्रामसिंह पलंगे, मा.श्री. राजेंद्र अनंत नागे, मा. सौ. घोडके मॅडम विषय तज्ञ BRC कराड, श्री. दत्तात्रय फुके, श्री. निलेश जाधव, श्री. दिगंबर बेडके मा.श्री.शंकर रामुगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Views: 821
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
भारतीय मजदूर संघाचा 66 वा वर्धापनदिन साजरा !!

भारतीय मजदूर संघाचा 66 वा वर्धापनदिन साजरा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)