• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या ‘गजीनृत्य’ खेळाकडे तरुणाईने फिरवली पाठ

माणगंगा by माणगंगा
March 29, 2023
in सांगली
0
माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या ‘गजीनृत्य’ खेळाकडे तरुणाईने फिरवली पाठ

माणदेशी माणसाची ओळख असणाऱ्या ‘गजीनृत्य’ खेळाकडे तरुणाईने फिरवली पाठ

गजनृत्य ही माणदेशाची ओळख असून. स्थानिक बोलीभाषेत गजीढोल या नावाने हा खेळ परिचित आहे. या खेळाला काही ठिकाणी चुळण असंही म्हटले जाते. ढोलवादकाच्या टिपरीनुसार चाल बदलते. यात त्याचे हावभाव, पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. आवाजातील चढउताराप्रमाणे नृत्याला गती येत असते. सनई, सूर, तुतारीने नृत्याला ताल निर्माण होतो. गजनृत्याचे ५५ प्रकार आहेत. त्यांना ‘घाय’ असं म्हटलं जातं……..

लोककला व लोकनृत्यांची माणदेशची ओळख असलेल्या गजनृत्याकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. रोजगार-शिक्षणामुळे आलेले सामाजिक बदल अशा अनेक कारणांमुळे आटपाडीसह दुष्काळी माणदेशातील गावागावांतील हा खेळ-कलाप्रकारास उतरंड येऊ लागली आहे.

गजनृत्य ही माणदेशाची ओळख. स्थानिक बोलीभाषेत गजीनृत्य म्हणूनही हा खेळ परिचित आहे. जाणकारांच्या मते किमान सुमारे दीड-दोनशे वर्षांची ही नृत्यपरंपरा असावी. प्रामुख्याने माणदेशाचा भाग असलेल्या तीन जिल्ह्यांतील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांत गजनृत्य (गजीढोल) खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. नृत्य करणारा गजी, ढोल वाजवणारा ढोल्या, गजाची घाई लावणारा म्होऱ्या अशी यातल्या खेळाडूची ओळख आहे.


या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्त्वाची असते. पथकातील सुमारे पंचवीस-तीस जण रंगीत रुमाल उडवत तालबद्ध नृत्य करतात. तीन बटनी नेहरू शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातात रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेल्या पोशाखातील सर्वांना पाहणे आनंददायी असते.

या खेळाला काही ठिकाणी चुळण असंही म्हटले जाते. ढोलवादकाच्या टिपरीनुसार चाल बदलते. यात त्याचे हावभाव, पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. आवाजातील चढउताराप्रमाणे नृत्याला गती येत असते. सनई, सूर, तुतारीने नृत्यात ताल निर्माण होतो. गजनृत्याचे ५५ प्रकार आहेत. त्यांना ‘घाय’ असं म्हटलं जाते.


खेड्यात सणासुदीला,लग्नकार्यात व देवांच्या यात्रेत,देवाच्या सवासिनी,देवाचा वालुग व वर्षातून येणाऱ्या यात्रा जत्रा अशा अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गजनृत्याचे सादरीकरण केले जाते. तर बऱ्याच ठिकाणी गजनृत्या च्यां स्पर्धाही असतात. या मध्ये मोठ मोठाली बक्षीस ही दिली जातात.
चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य टिकावं असं प्रत्येकाला वाटते; मात्र काळाची आव्हाने या खेळप्रकारासमोर उभी आहेत.

वैशिष्ट्य म्हणजे आरेवाडी परिसरातल्या अशा एका चैतन्यपूर्ण गजनृत्याचा समावेश दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात करण्यात आला होता. तसेच परदेशातही ते सादर करण्याची संधी कलाकारांना मिळाली होती. परंतु आधुनिक काळातील शिकलेल्या युवा पिढीने माणदेशाची ही लोकनृत्य कला समजावून घेतली पाहिजे व तो वारसा पुढे चालवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.


प्रतिक्रया……


अनेक वर्षापासून म्होरक्या म्हणून मी घाय लावतो. कोणतंही मानधन नाही. कामधंदा सोडून वेळ द्यावा लागतो. बक्षीस रूपात मिळणारे पैसेही मंडळाला जमा करावे लागतात. या खेळाचा नादच लागतो. वेळ जातो. पैसे मिळत नाहीत. नव्या पोरांना समजून सांगतानाही वेळ जातो. तरुण मंडळी आता खेळायला लाजतात. आता कुणाला यासाठी वेळ आहे ?


विलास खरजे, शंकर खताळ – म्होऱ्या

गेल्या पंधरा वर्षांपासून मी ढोल वाजवतो. धनगरच नव्हे तर सर्व जातीधर्माचे लोक खेळतात. काम सोडून त्याला वेळ द्यावा लागतो, तरच त्यातील बारकावे (तिढे) समजतात. ढोले आणि म्होरे याची सांगड असेल तर खेळ चांगला होतो. शरीराचा पूर्ण व्यायाम करणाऱ्या या खेळासाठी तरुण पिढीला वेळ नाही. कमाई काही नाही तर पदरमोडच होते. सहजासहजी खेळ जमत नाही. आमच्यासारख्या कलावंतांना मानधन मिळाले तर बरे होईल. तरुणांनाही आकर्षण वाटेल. –


ढोले – एकनाथ मोटे, सुखदेव मोटे

Views: 459
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पीडब्ल्यूडी विभाग आणखी किती जणांचे जीव घेणार… झरेत छोटा हत्तीच्या धडकेत एकाचा मृत्यू

पीडब्ल्यूडी विभाग आणखी किती जणांचे जीव घेणार... झरेत छोटा हत्तीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)