पीडब्ल्यूडी विभाग आणखी किती जणांचे जीव घेणार
झरेत छोटा हत्तीच्या धडकेत एकाचा मृत्य
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी येथील पोपट बाळू खिलारी हे रस्ता ओलांडत असताना MH50N 1954 या क्रमांकाचां छोटा हत्ती दिघंची कडून मायणीकडे निघाला होता. या छोटा हत्तीने खीलारी यांना धडक दिल्याने खीलारी जखमी झाले होते.त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

झरे येथील बस स्थानकाच्या पूर्वेस गोपाळ स्वीट मार्ट च्या समोर पोपट बाळू खिलारी हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्तीने धडक दिल्याने खिलारी हे जागीच बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी म्हसवड येथील दवाखान्यांमध्ये नेण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी मागील दोन महिन्यांमध्ये झरे येथे भरधाव वेगाने ट्रकाने एका महिलेला उडवले होते. त्यामध्ये ती महिला जागीच ठार झाली होती. तसेच याच महामार्गावर विभूतवाडी येथील पुलावर अनेक अपघात झाले आहेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
या महामार्गावर कुठेही गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव वेगाने जात असतात यामध्ये अनेकांचे आतापर्यंत जीव गेले आहेत. तरी पीडब्ल्यूडी विभागाने या महामार्गावर गावानजीक गतिरोधक बसवावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांची होत आहे. तरीसुद्धा पीडब्ल्यूडी विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत म्हणजे पीडब्ल्यूडी आणखी किती जणांचे जीव घेणार हा गंभीर विषय आहे.
पीडब्ल्यूडी विभागाला लोकांच्या जीवाचे महत्व अद्याप कळेना .त्यामुळे पीडब्ल्यूडी विभाग गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तरी संबंधित विभागाने पीडब्ल्यूडी विभागाची चौकशी करून गतिरोधक बसवण्यास टाळा करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.







