थकीत ऊस बिले 18 टक्के व्याजाने मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे रायगाव शुगर पॉवर समोर झरे तील शेतकऱ्यांचे आंदोलन
रायगाव शुगर पॉवर लिमिटेड रायगाव येथे थकित ऊस बिल 18% व्याजासहित मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
अखिल भारतीय किसान सभा यांच्या मार्गदर्शनाखाली ,झरे ता. आटपाडी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे 2018- 19 मध्ये रायगाव शुगर पॉवर लिमिटेड रायगाव या कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस घातला होता त्याचे अद्याप बिल शेतकऱ्यांना मिळाले नाही अनेक वेळा लेखी तक्रारी करून प्रसिद्धी माध्यमातून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नाही.
उसाचे बिल मिळण्यासाठी झरे गावचे सामाजिक कार्यकर्ते आधिकराव माने यांनी कार्यकर्त्यांसह बऱ्याच वेळा कारखान्याला लेखी विनंती केली होती व आंदोलनाची इशारा दिला होता तरीसुद्धा ऊस बिल मिळाले नाही. म्हणून ना इलाजाणे आजपासून रायगाव शुगर पॉवर लिमिटेड येथे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या मारला आहे.







