आटपाडीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले…. तिघांना कोरोनाची लागण
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुन्हा कोरोना ने डोकं वर काढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज तिघेजण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मास्क वापरावे असे आव्हान वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांनी केली आहे.







