शिक्षण सेवक पतसंस्थेच्या सल्लागारपदी आलिम शेख सर यांची निवड
माणगंगा न्यूज नेटवर्क सांगली:-
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक संस्थेच्या पलूस शाखा सल्लागारपदी पलूस येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल पलूस चे मुख्याध्यापक आलीम शेख यांची निवड झाली.या निवडीबद्दल सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सह. पतसंस्थेचे सचिव निशांत जाधव यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
समारंभासाठी सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील ,उपाध्यक्ष नानासाहेब शेजाळ ,बी.एम.पाटील ,यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहनराव मोरे ,देवेंद्रगिरीजी विद्यालयाचे एस.एस.नाईकल,सेकंडरी स्कूल भिलवडीचे एल.एल.माने,कन्या महाविद्यालय कडेगाव चे बी.के.माने, प्रतिनिधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी.वाय.जाधव,शिवाजी लाड ,दीपक शिस्वरे आदी मान्यवर उपस्थित होते.या निवडीबद्दल प्रशालेमध्ये मदरसा संस्थेचे नाजीम बदिउज्जमा शेख यांच्या हस्ते प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.







