शाहीर सुर्यवंशी यांच्या ग्रंथतुलेसाठी गोमेवाडीच्या निरंकारी मंडळाकडून पुस्तके प्रदान .
श्री . शाहीर आनंदराव केशव सूर्यवंशी जन्मशताब्दी निमित्त आयोजित ग्रंथतुला व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ग्रंथतुलेसाठी संत निरंकारी मंडळाच्या प्रकाशन सेवेच्या वतीने गोमेवाडी येथे ३० पुस्तके प्रदान करण्यात आली .
शाहीर श्री . आनंदराव केशवराव सुर्यवंशी यांनी राज्य आणि देशभर शाहीरी आणि लोककलेच्या माध्यमातून केलेल्या जनसेवे बद्दल व्यसनमुक्ती व लोककलेचा वारसदार या पुरस्काराने नुकताच राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे . महाराष्ट्र राज्य नाभीक महामंडळ शाखा सांगली आणि अंकलखोप यांच्यावतीने शाहीरांची ग्रंथतुला व जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . त्या पार्श्वभूमी वर ही गोमेवाडीतून पुस्तके देण्यात आली .
या निमित्ताने, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ जिल्हा सांगली शाखा गोमेवाडी गावातील सर्व नाभिक बांधवांना ग्रंथ तुलेसाठी संत निरंकारी मिशनची ३० पुस्तके देण्यात आली .
संत निरंकारी मंडळाची प्रकाशन सेवा करताना विवेक जवळे, अथर्व जवळे, सोमनाथ झेंडे, परशुराम शिरसागर, महेंद्र सिरसागर, रमाकांत सोहनी अध्यक्ष, इत्यादी अनेक जन उपस्थित होते .






