राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे
आटपाडी प्रतिनिधी
.आमचे नेते जयंतराव पाटील यांचा माणगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये काहीही संबंध नसताना त्यांच्या नावाने शिमगा करणे चुकीचे आहे. आपण राष्ट्रवादीशी किती एकनिष्ठ
राष्ट्रवादी पक्षाचे एबी फॉर्म घेता आणि रात्रीत भाजपमध्ये प्रवेश करून जयंतराव पाटील यांच्या पाठीत खंजीर कुपसता, आणि त्यांच्याच नावाने आता शिमगा करताय हे योग्य नाही.
आमच्या आजोबांच्या नावाने असलेले कारखान्याचे शेअर त्यांच्या पश्चात वारसाच्या नावे झाले कसे नाहीत असा प्रश्न आम्हाला पडला होता.
आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी नाही म्हणणारे लोक आता राष्ट्रवादीने आमच्या विरोधात षडयंत्र रचले असे म्हणायला लागलेत, बाजार समितीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राष्ट्रवादी पदाधिकारी यांना सरळ सरळ त्यांच्याकडे कुठे मतदान आहे. म्हणून उमेदवारी नाकारने तसेच गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी दोन्ही बाजूचे ए. बी. फॉर्म घेऊन स्वतः एका रात्रीत पक्षा बरोबर गद्दारी केलेली आटपाडी मधील जनता अजून विसरलेली नाही,
राष्ट्रवादीने आतापर्यंत केलेल्या सहकार्याची आपण कशी त्यावेळी गद्दारी करून फसवणूक केली होती. त्यांचे फळ मिळणारच असा सूर आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मधून यायला लागला आहे.
आमचे नेते जयंतराव पाटील यांचा काहीही संबध नसताना त्यांना काहीही बोलून उगीच खऱ्या अर्थानं मूळ विषयाला बगल देऊ नका. यावेळी तालुक्यातील हक्काची प्रामाणिक तरुणांची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पाठीमागे भिंत म्हणून उभी राहणार असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ए.बी. फॉर्म स्वतःजवळ ठेवून रात्रीत भाजपमध्ये
एन.पी. खरजे —प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस







