आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू
झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये अनेक झाडे उनमळून पडली, तर विजेच्या धक्क्याने म्हैशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. पाऊस पडल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसू लागले. परंतु वादळ जास्त असल्याने अनेक ठिकाणी हानी झाली आहे. तर वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती परंतु आज सकाळपासूनच उखाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरात वादळ व विजांचा कडकडाट होऊन पावसाने सुरुवात केली झरे, खरसुंडी परिसरामध्ये तसेच करगणी परिसरामध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला .तर आटपाडी, दिघंची या भागांमध्ये तुरळक पाऊस झाला.
काही ठिकाणी पाणी साचून वाहू लागले तर अन्य ठिकाणी जमीन थोडीफार ओलसर झाली आहे. ज्या भागामध्ये टेंभूचे पाणी सुरू आहे त्या भागामध्ये पाऊस कमी जास्त पडला तरी तेथील शेतीची मशागत व पेरणी होऊ शकते ,परंतु जो भाग टेंभू योजनेपासून वंचित आहे .अशा भागांमध्ये पावसाची गरज आहे पाऊस पडला तरच शेतीची मशागत होईल व पेरणी होऊ शकते.
आजच्या पावसामध्ये वादळाचे प्रमाण जास्त असल्याने अनेक ठिकाणी झाडे उनमळून म् पडलेले आहेत झाडे उनमळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.तर झरे खरसुंडी रस्त्यावरती झाडे उनमळून पडलेली पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
तसेच तहसीलदार बी.एस .माने यांनाही याची कल्पना देण्यात आली आहे.
तसेच विजेच्या धक्क्याने म्हशीचे पिल्लू मेल्याने त्याचे पंचनामे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी करण्यासाठी फोनवरून त्यांना कल्पना दिली आहे .परंतु पिल्लाला जखम झाली असेल तर आम्ही पंचनामे करू असे उत्तर पशुवैद्यकीय तालुका अधिकारी कांबळे यांनी दिले.
तर याबाबत तहसीलदार बीएस माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हशीच्या पिल्लाचे फोटो व रस्त्यावरती पडलेल्या झाडांचे फोटो मागवून घेतले व यावर त्वरित कारवाई करणार असल्याचे सांगितले.
झरे खरसुंडी रस्त्यावर ठेवून मळून पडलेल्या झाडे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी यांना आदेश दिले आहेत. तसेच विजेच्या धक्क्याने म्हशीचे पिल्लू मृत्य झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे गवकामगार तलाठी यांना आदेश दिले आहेत.
तहसीलदार बी. एस. माने







