विभुतवाडीत दाऱ्याबा मंदिर व विठ्ठल मंदिर समोरील सभामंडपाचा शुभारंभ…
गावातील विविध मान्यवरांची उपस्थिती


विभूतवाडी ता. आटपाडी येथील ढोलेमळा येथे दर्याबा मंदिराचे काम सुरू आहे. या मंदिराच्या समोर सभामंडप व्हावा तसेच विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरील सभामंडप व्हावा ही गावातील नागरिकांची इच्छा होती व सभा मंडप होण्यासाठी चौकाचौकांमध्ये चर्चा होत होती निधी उपलब्ध कुठून करायचा याची चिंता समस्त ग्रामस्थांना लागली होती
परंतु युवा नेते सुरज पाटील यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याशी याबाबत चर्चा केली व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाने दोन्हीही मंदिराच्या सभागृहासाठी निधी उपलब्ध झाला होता.
परंतु युवा नेते सुरज पाटील यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याशी याबाबत चर्चा केली व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाने दोन्हीही मंदिराच्या सभागृहासाठी निधी उपलब्ध झाला होता.
या दोन्ही सभा मंडपाच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात आज करण्यात आली या वेळेला गावातील व ढोलेमळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युवा नेते सुरज पाटील, सरपंच चंद्रकांत पावणे, ठेकेदार संदीप कातुरे , तसेच गावातील पदाधिकारी विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.







