माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे सन 2023-24 ची नवीन डीएमएलटी व रेडिओ टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आयोजित प्रसंगी बोलत होते.लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आणाभाऊ साठे यांची जयंती माणगंगा इंग्लीश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करीत पुष्पहार अर्पण करून साजरी केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत मासाळ, प्राचार्या सविता मासाळ,उपप्राचार्या श्रद्धा करमाळकर,प्रा.संतोष बगाडे, प्रा.गुंजाने, माणगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल विभागाचे मुख्याध्यापक रावसाहेब मासाळ व इतर माजी विद्यार्थी, नवीन प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.
ॲड दत्तात्रय हांगे पुढे म्हणाले की,अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी डीएमएलटी व रेडिओ टेक्नॉलॉजी सारख्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण पूर्ण करावे. आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून, कामातील समय सूचकता ओळखुन गांभीर्याने काम केले पाहिजे. दोन वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला हमखास व्यवसाय अथवा नोकरीची सुवर्णसंधी चालून येणार आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडत आहेत.विविध तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे.माणगंगा शैक्षणिक संस्था अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी तयार करीत आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.मासाळ म्हणाले,पॅरामेडिकल कॉलेज स्थापन करण्यासंदर्भात ग्रामीण भागातील मुलीं मुलांचे विचार केला. विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट अवस्थेत राहू नये.शिवाय हा कोर्स पूर्ण केल्यावर त्या मुलीला मुलांना स्वतच अस्तित्व तयार करता यावे यासाठी व्यवसाय शिक्षण चे डीएमएलटी व रेडिओ टेक्नॉलॉजी सारखे कोर्स सूरू करण्यात आले. २०१३ पासून आतापर्यंत जे विद्यार्थ्यांनी या कॉलेज मध्ये प्रशिक्षण घेतले ते सर्व मुलांना नोकरी करीत आहेत तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.