जिल्हा परिषद निधीतून नाभिकाना साहित्य पुरवठा करण्याची मागणी
त-हाडी आज नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हित वर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार सुप्रियाताई गावीत यांना दुकानदार नाभिक समाजास साहित्य रुपी मदत व्हावी यासाठी आज निवेदन देण्यात आले .नंदुरबार जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांना जे समाज बांधव सलून व्यवसाय करतात.
नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे .तरी आपण जिल्हा परिषद निधी मधून नाभिक दुकानदार बांधवांसाठी खुर्ची,आरसा व इतर दुकानात लागणारे साहित्य आपल्या स्तरावरून खरेदी करून वाटप करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी नंदुरबार जिल्हा नाभिक समाज वर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात आज पावेतो एकदाही जिल्हा परिषदेकडून नाभिक समाजास साहित्य वाटप करण्यात आलेले नाही.
तरी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करून कमीत कमी 20 समाज बांधवांना तरी मदत करावी. 20 जणांची यादी आम्ही आपल्याला कडे जमा करू. तरी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरून आम्हाला मदत करावी. निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज भदाणे सचिव हिमांशु बोरसे उपाध्यक्ष नितीन मंडलिक जिल्हा संघटक विजय सैदाने कोषाध्यक्ष शिवाजी मिस्त्री, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे, संचालक छगन सूर्यवंशी, सुभाष अहिरराव इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.







