• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शाहिद.. विष्णू सुखदेव पुकळे २० स्मृतिदिन विशेषांक

माणगंगा by माणगंगा
August 13, 2023
in सांगली
0
शाहिद.. विष्णू सुखदेव पुकळे २० स्मृतिदिन विशेषांक

कष्टाला धुमारे फुटले!
शहीद विष्णू सुखदेव पुकळे २० स्मृतिदिन विशेषांक


आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावचे सामान्य व कष्टकरी कुटुंबातील खडतर परिश्रमातून उभे राहून पुढे देश सेवेप्रती आपले जीवन समर्पित केलेल्या शहीद जवान विष्णू सुखदेव पुकळे यांचा आज विसावा स्मृतिदिन! त्यानिमित्त त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर व संघर्षावर टाकलेला प्रकाशझोत!
बनपुरी येथील अत्यंत प्रामाणिक सरळ मार्गे कष्टकऱ्यांचे आयडॉल श्री.सुखदेव भाऊ पुकळे व सौ.कलाबाई यांच्या पोटी सहा जुलै 1981 रोजी विष्णू यांचा जन्म झाला. त्यांचे थोरले बंधू जगन्नाथ, त्यांच्या पाठीवर तीन बहिणी व नंतर शेवटी विष्णूचा जन्म झाला.


आई-वडील ऊस तोडायला जायचे. आजोबा आणि आजी यांच्याजवळ ही नातवंडे राहत. घरी असलेल्या जनावरांचा संभाळ करायचे. काही वेळा आई-वडिलांबरोबर बहिणी जायच्या. विष्णू यांनी घरी असलेल्या शेळ्या राखीत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण श्रीमंत बाबासाहेब देशमुख हायस्कूल बनपुरी येथे पूर्ण केले.घरकामाच्या व्यापामुळे शिक्षणाकडे जेमतेमच लक्ष असायचे.मार्च 1997,1998 सालच्या आसपास दहावी उत्तीर्ण झाले.असे बालपण गुजरत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.


पुढे महाविद्यालयीन शिक्षणाला न जाता परिस्थितीमुळे ते घरी असणाऱ्या शेळ्या राखू लागले. मात्र सवंगड्याच्या संगतीने त्यांनी आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शारीरिक कसरत करण्याची त्यांची अंगभूत सवय होती. घरातील कामे व्यवस्थित पाहून घरकामाला हातभार लावत असे. 2001 साली कोल्हापूर येथील टेंबलाईवाडी येथे आर्मीची भरती होती. त्यावेळी बनपुरी गावातील मुले भरतीसाठी निघाली होती.

बंधू जगन्नाथ हे तासगावमध्ये पोलीस दलामध्ये नोकरी करत असताना त्यांना घरातून त्यांच्या आईने फोन करून “विष्णू भरतीला जाणार आहे, त्याला जाऊ दे का?” अशी विचारणा केली. आईकडे पैशाचा हट्ट करून भरतीसाठी जाण्याचा ठाम निश्चय केला. थोडेफार अचानक उपलब्ध असलेले पैसे व जेवणाचे गाठोडे बांधून कोल्हापूर येथे सर्वजण भरतीला गेले.

बंधू जगन्नाथ यांनी सुरुवातीला नकार दिला असला तरी प्रबळ इच्छाशक्ती पाहून भरतीत जाण्यासाठी बंधू जगन्नाथ यांनी होकार दिला. तेथे सर्वांबरोबर जाऊन भरती प्रक्रिया होत असताना पहिल्या दिवशी मैदानी चाचणीतील मुले परत आल्यानंतर त्यांची मात्र मैदानी चाचणी व्यवस्थितपणे पूर्ण झाली होती. लेखी चाचणी ही पूर्ण झाली होती आणि वैद्यकीय चाचणीसाठी तिसऱ्या दिवशी ते एकटेच तेथे राहिले. सर्व मुले आल्यामुळे व हा एकटाच थांबल्यामुळे हुरहुर लागू लागली, त्यामुळे घरच्या लोकांना काळजी वाटू लागली. त्यावेळी फोनची व्यवस्था नव्हती. घरी लँडलाईन फोन असल्यामुळे त्यांनी घरी फोन केला तरच संपर्क झाला असता.

म्हणून भाऊ जगन्नाथ व संजय राजमाने यांनी भर पावसात कोल्हापूर गाठले.पावसामुळे आसरा मिळेल तिथे बसलेल्या मुलांमधून रात्री 8.30 वाजता शोधून काढले. पहाटे मेडिकल कॅम्प असल्यामुळे तो कॅम्प पूर्ण झाल्यानंतर येतो असे समजल्यानंतर ते परतले. वैद्यकीय चाचणी पूर्ण करून ते परत आले.1.7.2001 जॉइनिंग करून घेऊन बेळगाव एम एल आय मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी नुकतेच कारगिल युद्ध झाले होते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राने भरती करून घेतलेल्या मुलांना नऊ महिन्याच्या ट्रेनिंगऐवजी जादा वेळ वाढवून सहा महिन्यातच पूर्ण क्षमतेने प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणामध्येही त्यांना फायरिंग, शूटिंगमध्ये प्रथम क्रमांक, अव्वल स्थान होते. त्यांचे फायरिंग चांगले होते. प्रशिक्षण पूर्ण करून सुट्टीवर आल्या नंतर सुट्टीचा कालखंड संपल्यानंतर पश्चिम बंगाल येथे बिनागुडीला पोस्टिंग झाले. तेथून चार महिन्यानंतर जम्मू-काश्मीर पूंच्छ येथे गेले. सात आठ महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर तेथे चार महिन्याची सेवा बजावली. असे वर्षं सव्वा वर्ष पूर्ण झाले व ते सुट्टीला येथे आहे. नंतर महिन्याभरानंतर ते जॉईन झाले.


13 ऑगस्ट रोजी चार-पाच वाजण्याच्या सुमारास घरच्या लँडलाईन नंबरवर फोन आला होता. त्यावेळी आईबरोबर त्यांचा बोलणे झाले.15 ऑगस्टचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाहेर निघालो आहे असे सांगितले. साहित्य घेऊन आल्यानंतर अंबुस लावायला (आतंकवादी असतील तर दबा धरून बसून उडवून टाकायच्या ) सात ते आठ जणांची तुकडी गेली. त्यादरम्यान त्यांना अतिरेक्याची चाहूल लागल्यानंतर विष्णू यांनी फायरिंग केले. त्यांनी दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. यात त्याचा होसला वाढला होता.

ते पुढे-पुढे जात होते. सहकारी त्यांना ‘पुढे जाऊ नको’ म्हणून आवाज देत होते. पुढील अतिरेकी संपले असतील म्हणून पुढे जात असतानाच समोरून शूट झाले व हनुवटीला गोळी लागली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्यावेळी काही उपयोग झाला नाही. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
आटपाडी पोलीस ठाण्याला भाऊ जगन्नाथ यांना दहा वाजण्याच्या सुमारास फोन आला. हे समजतात घरी आल्यानंतर त्यांनी घरात काय लगेच काय बोलले नाहीत, वारंवार फोन येऊ लागल्यामुळे घरच्यांनाही अंदाज आला. ते शहीद झाले. तिसऱ्या दिवशी पार्थिव आल्यानंतर 16 रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी दिल्लीला पंधरा तारखेला मानवंदना झाली होती. आता अंत्यविधीच्या कट्ट्यावरच समाधी बांधण्यात आली आहे.


स्वभावगुणाच्या बाबतीत दैवी गुण असलेला,मनमिळावू स्वभावाचा व्यक्ती म्हणून परिचित होते. अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. दुधाची चरवी घेऊन दूध घालायला आल्यानंतर ते काम उरकल्यानंतर म्हसोबाच्या तालमीजवळ येऊन उजेडाची सोय नसताना अंधाऱ्या रात्री व्यायाम करायचे. राजमाने साहेब आणि पुकळे बंधू यांचे सवंगड्याचे संबंध होते. तालमीत व्यायाम करीत असताना वस्तादनी मलखांब तयार करून त्या मलखांबावर भिंगरी प्रमाणे तिघेही सवंगडी फिरत होते. त्यावेळेस खेळाला प्राविण्य या बाबी कोणाच्या मनी ध्यानी येत नव्हत्या.


भयंकर समंजस असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आजच्या तरुणांना तो घेण्यासारखा आदर्श आहे. घरचे काम प्रथम करत असत. कठीण परिस्थितीत ते काम करत असायचे. घरी छोटेसे किराण दुकान होते.त्यावेळी सायकलवरून किराणा मालाचे साहित्य कॅरेजवर एक पोते व मध्ये एक पोते आणि दोन पिशव्या सायकलच्या हँडलला अडकवलेल्या असे साहित्य घेऊन पायी चालत आणत असायचे. दुकान व शेळ्या सांभाळत भरती
पर्यंतचा प्रवास केला. हलकीच्या परिस्थितीतून, संघर्षमय परिस्थितीतून जीवनाची वाटचाल केली.


आई-वडिलांच्या कष्टाला चांगली आलेली ही फळे होत. प्रामाणिक कष्ट, हार्ड वर्क कशाला म्हणायचं ते त्यांच्या आई-वडिलांकडून शिकावं. आजही त्यांचे वडील सर्व कामे करतात.
शहीद होण्यापूर्वी सुट्टीवरून ड्युटीवर जॉईन होण्यासाठी जात असताना त्यांच्या लग्नाबाबत चर्चा झाली होती.मात्र प्रथम घर बांधण्याचे काम उरकून पुन्हा लग्न करण्याचा विचार त्यांनी केला होता.
शहीद झाल्यानंतर आजपर्यंत त्यांच्या वीस वर्षाच्या पुण्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी वृक्षारोपणाचा व सलगपणे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बर्ड फ्लूच्या साथीच्या कालावधीतील प्रकाश बापू ब्लड बँकेचा कॅम्प वगळता 19 वर्षाच्या कालखंडामध्ये वसंतदादा शासकीय रुग्णालय ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदानाचा कॅम्प आयोजित केला जातो. पुण्यदिनी धार्मिक विधीही पूर्ण केला जातो. एमपीएससी परीक्षेत निवड झालेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,असे याठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत.

या कार्यक्रमासाठी आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश अशा मान्यवरांची उपस्थिती होती. यानिमित्ताने स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी व्याख्यान भरपूर प्रमाणात घेतली आहेत. काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते
सातवे येथील बाल वाद्य वृंद , भक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. जिल्ह्यातील सुमारी वीस पीएसआय भरती झालेल्या उपनिरीक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. डॉ. आर एस पाटील यांच्या सौभाग्यवतीने प्रेरणा घेऊन उपजिल्हाधिकारी हे प्रशासकीय पद प्राप्त केले.


सध्या वाचनालयाचा विषय टप्प्यामध्ये आहे.त्यांची आठवण म्हणून शहीद विष्णू पुकळे सभागृह आहे. गेल्या आठवड्यापासून योग व संस्कार शिबिर सुरू आहे. त्यातून मुलांना व्यायामाचे महत्त्व समजू लागले आहे. जवान भरती व्हावा म्हणून विजेची सोय नसतानाही तालमीमध्ये कसरत करत असताना तोच ऐतिहासिक वारसा जतन करावा, माणसांनी जावे म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. वाचनालयाचे फर्निचर सध्या तयार असून ते आणून चालू करण्याचा संकल्प आहे.
गेल्या दोन वर्षापासून हा दिवसभराचा कार्यक्रम झाला की सायंकाळी वंदे मातरम चिंतन बैठक आयोजित करतो. पहिल्या वर्षी प्रा. श्रीकृष्ण पडळकर, गतवर्षी प्राध्यापक बालाजी वाघमोडे,यावर्षी भाई शिवराम मासाळ, यांच्या चिंतनाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.


त्यादिवशी एकत्र येऊन सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे याविषयी चर्चा केली जाते. स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण जसे साजरे होतात तसे बनपुरीमध्ये अनेक जवानांनी उपस्थितती दर्शवली. जवानांची संख्या लक्षणीय होती. यावर्षी माजी सैनिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे.. तरुण मुलांना ते स्फूर्ती स्थान आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे फळ
आई वडील साध्या भोळ्या स्वभावाचे असल्यामुळे विष्णूच्या निधनामुळे दोघांनीही खाली घेऊन त्रास होऊ लागला. मनाचे खच्चीकरण होऊ लागले. कष्टातून उभा राहिलेले हे कुटुंब होते. कष्ट हेच भांडवल होते. रस्ते, नालाबांध, तलाव यासारखी सर्व कामे या उभयतांनी केली आहेत. एकही काम त्यांच्याशिवाय पूर्ण झाले नाही.

Views: 216
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसखोर (ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा)

अंधेरी एमआयडीसी एसआरए योजनेतील ताबाधारकांनाच ठरविले घुसखोर (ताबाधारकांसह वंचित सदनिधारकांचा उग्र आंदोलनाचा इशारा)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)