संपादक प्रसाद कडव यांचा सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
दिघांची ता. आटपाडी येथे द बुद्धा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साहित्य भूमी चे संपादक प्राध्यापक प्रसाद कडव यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष अमित जयवंत वाघमारे उपाध्यक्ष रवींद्र ज्ञान वाघमारे, सचिव ग्रामपंचायत सदस्य किरण वाघमारे, ज्येष्ठ नेते सुधाकर चोथे, युवा उद्योजक आमिर भाई तांबोळी ,अमोल वाघमारे, अतुल वाघमारे, पत्रकार पोपट वाघमारे उपस्थित होते.
द बुद्धा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमित वाघमारे म्हणाले पत्रकारिता ही निर्भीड आणि सक्षमपणे अविरतपणे निस्वार्थपणे दिघंची आणि आटपाडी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक भौगोलिक अशा विविध प्रकारच्या समस्या शासन दरबारी मांडून संपादक प्रसाद कडव यांनी या भागातील जनतेला न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याने एक दिघंचीचा सुपुत्र म्हणून आणि संपादक म्हणून यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्यांचा आज आम्ही द बुद्धा बहुउद्देशीय सवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करत आहे
ग्रामपंचायत सदस्य किरण वाघमारे म्हणाले समाजातील वंचित घटकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे प्रसाद कडव यांना जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये अनेक यशस्वी गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम करत आहे. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







