श्री गुरुदत्तांच्या चित्रासमवेत चित्रकार .प्रतिक अभंगराव .
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतील लुटून श्वापद तस्कर
ये श्री दत्ता सांभाळी मज
दावी रूप विराट
गुरुवीण कोण दाखवील वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट ………
या कवी ग . दि . माडगूळकरांच्या ओळी गुरुंचे अनन्यसाधारण महत्व सांगून जातात . आज मानवी जीवन अशांत झाले आहे . तेथे समाधान कशातच उरले नाही मग विसावा शोधावा कोठे ,तर तो दत्तमहाराजांच्या स्मरणात आहे असे चित्रकार सांगतात .
आज चित्रकार .प्रतिक अभंगराव यांचे श्री दत्त गुरूंचे तैल चित्र रेवणसिद्ध मंदिरात लावले गेले आहे . हे चित्र प्रत्येक भक्तास स्फूर्तिदायक आणि प्रासादिक भाव देणारे आहे . हे चित्र साकारताना खूप अध्यात्मिक अनुभव आले व चित्र साकारतानाचा प्रवास खूप सुखकर होता असे चित्रकार सांगतात .
हे चित्र साकारण्यास दीड महिना इतका कालावधी लागला असून पाच फूट उंची व तीन फूट रुंदी इतका चित्राचा भव्य आकार आहे .अभंगराव यांची इतर श्री नाथांची चित्रे प्रसिद्ध आहेत .त्यांच्या या अथक परिश्रमास व कलेस गुटुकृपांकित आशीर्वाद लाभो हीच दत्त गुरु व रेवणसिद्ध यांच्या चरणी प्रार्थना .....







