झरेत मुलाच्या वाढदवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता.आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना शाळे जीवनात स्पर्धा परीक्षांचे ज्ञान मिळावे तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून शिक्षक सोमनाथ गाडे यांनी स्वतःचा मुलगा चिरंजीव मोरेश्वर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रश्नपत्रिका संचाचे मोफत वितरण केले. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी ही ज्ञानरूपी शिदोरी विद्यार्थ्यांना उपयोगी पडावी….
आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या हातातून छोटेसे सतकार्य घडावे या उद्देशाने हेतूने शिक्षक गाडे स्पर्धा परीक्षा पुस्तिका प्रश्नसंच मोफत वितरण वितरणाचा उपक्रम राबविला या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रभाविक मुख्याध्यापक सुमित्रा डांगे यांनी केले सूत्रसंचालन विद्यादेवी बाड यांनी केले आभार श्जयंत देठे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सरपंच अंकुश पाटील उपसरपंच दादा भानुसे ग्रामपंचायत सदस्य सुरेश अर्जुन प्रमोद राजमाने उपस्थित होते पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते







