• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

“7 सप्टेंबर ……स्व.डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांची प्रथम जयंती””सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ “

माणगंगा by माणगंगा
September 6, 2023
in सांगली
0
“7 सप्टेंबर ……स्व.डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांची प्रथम जयंती””सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ “

“7 सप्टेंबर ……स्व.डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांची प्रथम जयंती”
“सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ “
आटपाडी प्रतिनिधी


सांगली जिल्ह्यामधील आटपाडी सारख्या बारमाही दुष्काळ असणाऱ्या तालुक्यामध्ये घरनिकी एक गाव असून आणि त्या गावाच्या सभोवताली असणाऱ्या वाड्यावस्त्यांमध्ये बेरगळवाडी हि एक ५०-५५ घरं असलेली छोटीसी वाडी आहे. या छोट्याश्या असणाऱ्या वाडीमध्ये जन्माला आलेले “सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ “

डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांचे वडील कै. रामदादा हे घरनिकी गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी एक होते. घरनिकी ग्रामपंचायत तसेच सर्व सेवा सोसायटी आणि इतर संस्थांमध्ये विविध पद भूषविलेले म्हणजेच वडिलांपासून गावाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यानं प्रतापसिंह बेरगळ यांचा सुद्धा राजकारणात चांगलाच वावर होता. परंतु फक्त राजकारण न करता समाजकारणात त्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलं होतं.

गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच स्मरण होणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत धडपडत राहणारे एवढेच नव्हे तर अन्यायाला वाचा फोडताना ”कमी तिथे आम्ही” याप्रमाणे नेहमीच लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ. प्रतापसिंह बेरगळ साहेबांना ”सर्वसामान्यांचा नेता” म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आपल्या कृतीतून सर्वसामान्य जनता असो, आपले वडीलधारे सहकारी असो, आपला मित्रमंडळींचा गोतावळा असो किंवा आपल्या भावबंदकीमधील असणारे नातेसंबंध हे अगदी घट्ट बांधून ठेवून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिसरामध्ये नावलौकिक होता.

प्रतापरावांचं प्राथमिक शिक्षण बेरगळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतून झाले, माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल घरनिकी, उच्च माध्यमिक झरे येथून आणि वैद्यकीय शिक्षण कोप्पल, कर्नाटका येथून पूर्ण केले. शालेय शिक्षणापासून ते माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिग्री पर्यंतच्या त्यांच्या प्रवासामध्ये आलेल्या प्रत्येक मित्र, वर्गमित्र, शिक्षक सगळ्यांच्या ते शेवटपर्यंत संपर्कात होते.
बालपणी च्या आठवणी सांगताना ते तासंतास दमत नसत. प्रत्येक मित्रावर जीवापाड प्रेम असणारे, मित्रांसाठी 24 तास उपलब्ध असणारे, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला दहा मिनिटांमध्ये आपलंसं करणारे, प्रत्येकाच्या ह्रदययावर राज्य करणारे, मैत्री मध्ये लहान मोठा, गरीब श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, गावाकडचा, शहरातला असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणारे सर्वांना आपलंसं करून सोडणारे विराट व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रतापराव बेरगळ. होय..

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे सर्वच जण वैद्यकीय व्यवसायासाठी एखाद्या मोठ्या शहराची निवड करतात. मुंबई-पुण्याकडे धाव घेतात. पण डॉक्टर साहेबांनी आपल्याच गावात राहून आपल्याच तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. रोज सपत्नीक 25 किलोमीटरचा प्रवास करून ते आटपाडी जवळील बनपुरी येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी जात असत.


२००७ पासून त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू होते. गोरगरीब रुग्णांना अल्पदारामध्ये वैद्यकीय सेवा, उपचार व मार्गदर्शन, जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन, वयोवृद्धांना पुढील उपचारांसाठी मदत तसेच प्रसंगी स्वतः त्यांना सांगली येथे नेऊन पुढील उपचारांसाठी ऍडमिट करणे हे सर्व करताना त्यांना अत्यंत आनंद मिळत असायचा.


गोरगरीब रुग्णांना त्यांच्या परिस्थिती नुसार बिल करून उपचार मिळत असायचा. ज्या रुग्णांची ऍडव्हान्स तपासण्या व उपचार करण्याची ऐपत नसेल त्यांना ते त्यांच्या आयुर्वेदिक उपचारप्रणालीने ठीक करण्याचा प्रयत्न करत असायचे. कोरोनासारख्या भयंकर महामारी मध्ये जेव्हा सर्व डॉक्टरर्स नी आपापले दवाखाने बंद ठेवले होते .त्यावेळी याच डॉ. प्रतापराव बेरगळ साहेबांचे श्री राम क्लिनिक रात्रंदिवस अविरत सुरू होते, रुग्णाच्या तपासणी पासून ते त्या रुग्णाला कोविड रुग्णालयात ऍडमिट करणे, त्याच्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, इंजेकशन्स उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या सर्व सुविधा करण्यासाठी रात्रंदिवस डॉक्टरां साहेबांची स्वतः धावपळ सुरू असायची.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या अनेक सेवाभावी संस्थांनी, पंचायत समिती आटपाडी, जिल्हा परिषद सांगली यांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं होते.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रामाणिक पणे काम करत असतानाच २०१६ च्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टी मधून आदरणीय मा. आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या घरनिकी गणातून त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ भूमीकाताई बेरगळ यांना संधी मिळाली व त्यांचे सासरे कै. रामचंद्र (दादा) बेरगळ व पती डॉ प्रतापसिंह बेरगळ यांच्या अफाट जनसंपर्कामुळे त्या भरघोस मताधिक्यानी विजयी झाल्या. राजकिय क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील तेवढ्याच समर्पण, प्रामाणिकपणा व लोकसेवेच्या भावनेतून काम करत असत.


पंचायत समितीच्या सभापती पदावर त्यांच्या पत्नी विराजमान असून ही त्यांनी तालुक्यामध्ये कधीही अविर्भाव मिरवला नाही. पत्नीला राजकीय क्षेत्रात स्वातंत्र देऊन त्यांनी सर्व राज्यकर्त्यांपुढे एक आदर्श ठेवला. पत्नी सरपंच असताना पती सरपंच म्हणून मिरवताना दिसतात, पत्नी सभापती असताना पती स्वतः ला सभापती म्हणवून घेतात पण या सर्वांना अपवाद व राजकीय नेत्यांसमोर एक उत्तम आदर्श होते डॉक्टर साहेब . त्यांनी पत्नीच्या प्रसिद्धीचा व पदाचा कधीही गैरवापर केला नाही . पत्नीस नेहमी आदर व सम्मानाची वागणूक देत असत.

राजकारणामध्ये काम करत असताना विरोधकांशी सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. बेरगळवाडी सारख्या खेडेगावमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षीय वरिष्ठ नेते, आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य भूमीकताई सभापती पदी विराजमान झाल्यानंतर सत्कार समारंभासाठी उपस्थित होते. हे डॉक्टर साहेबांच्या प्रेमळ व मैत्रीपूर्ण स्वभावामुळे च शक्य होऊ शकले.

डॉ. साहेब जीवनामध्ये जितकं महत्व मैत्री ला देत असत तितकंच प्रेम ते आपल्या कुटुंबावर करत होते, आई व वडीलबंधू विषयी आदर, पत्नीला समानतेची वागणूक, आदर या गोष्टी प्रत्येकाला शक्य नसतात. स्वतः व्यवसायाने डॉक्टर असूनही त्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल विशेष आपुलकी होती त्यांचे जास्तीत जास्त मित्र शिक्षक आहेत. शाळेतील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची विशेष उपस्थिती असायची.
गावातील आणि परिसरातील स्वतंत्रता दिन, प्रजासत्ताक दिन, विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी इ. ला त्यांची नेहमी उपस्थिती असायची. क्षेत्र कुठलंही असो त्यांचा कामाचा उत्साह व कल्पकता अवर्णनीय होती. त्यांच्यासारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची अशी अचानक exit त्यांचे कुटुंबीय, आप्तजन, इष्ठ मित्र, स्वकीय, सहकारी, त्यांच्या सर्वच परिचितांच्या जीवाला चटका लावणारी होती.

डॉक्टरांच्या पश्चात त्यांचे सामाजिक कार्य असेच अविरतपणे चालू ठेवण्यासाठी, त्यांच्या एकंदरीत जीवनाचा सार्थ उद्देश आणि त्यांच्या मनामध्ये असलेली आटपाडी तालुका आणि परिसर सारख्या दुष्काळी भागातल्या गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठीच स्व. डॉ प्रतापसिंह बेरगळ बहुद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या कार्याला अविरत चालू ठेवून त्यांच्या विचारांना त्यांच्या आचारांना खरी आदरांजली वाहण्याच काम होणार आहे.

आज डॉक्टरांना आमच्या मधून शारीरिकदृष्ठ्या जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. जरी ते आमच्यामध्ये शारीरिकदृष्ठ्या नसले तरीही ते आमच्या हृदयामध्ये जसे होते तसेच सदैव आहेत आणि पुढेही तसेच राहणार आहेत. याच त्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा व त्यांच्या स्मृतीस आदरांजली…

Views: 172
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पारेकरवाडीत राहुल हांडे यांचे दातृत्व.. हांडे परिवारात मार्फत थंड पिण्याच्या पाण्याचा फिल्टर मोफत बसवीला

पारेकरवाडीत राहुल हांडे यांचे दातृत्व.. हांडे परिवारात मार्फत थंड पिण्याच्या पाण्याचा फिल्टर मोफत बसवीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)