आटपाडी मनसेचे तालुका अध्यक्ष यांना तलाठी यांच्या पतीकडून सतुर दाखवीत दिली जिवे मारण्याची धमकी
आटपाडी तालुक्यात उडाली खळबळ,
आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांना माळेवाडी चे तलाठी यांच्या पतीने सतुर दाखवत दिली जिवे मारण्याची धमकी.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तलाठी सजेच्या ठिकाणी रहात नाहीत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होत आहे. म्हणून जिल्हा अधिकारी व आटपाडी तहसिलदार यांना दिनांक 21/03/2022 रोजी व दिनांक 26/06/2023 रोजी गायकवाड यांनी निवेदन दिले होते .
या निवेदनाची दखल घेऊन आटपाडी तहसिलदार यांनी दिनांक 05/05/2022 रोजी व 21/06/2023 तालुक्यातील सर्व तलाठी व सर्व मंडल अधिकारी यांना सज्जा च्या ठिकाणी राहाणेबाबत तसेच तलाठी कार्यालयामध्ये कोणत्याही खाजगी कर्मचारी यांची नेमणुक करू नये असे आदेश काढले होते .
यावरून मौजे माळेवाडी येथील तलाठी उज्वला बोथिंगे यांच्या पतीने गायकवाड यांना तु प्रत्येक वेळी तहसिलदार यांना तक्रार करतोस व पेपरला बातमी देतोस म्हणुन दिनांक 29/08/2023 रोजी सायंकाळी फोन करून शिवीगाळ करू केली . त्या नंतर प्रकाश गायकवाड यांनी त्याला संमजसपणे समजुन सांगितले. परंतु त्याने काही ऐकले नाही. त्यानंतर तो सायंकाळी 7 वाजता करगणी येथील प्रकाश गायकवाड यांच्या दुकानामध्ये येऊन प्रकाश गायकवाड यांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असणार्या शाईन दुचाकी च्या शिट खाली असलेला लोखंडी सत्तूर काढला व म्हणाला की इथून पुढे अशी तक्रार केलीस तर सतुराने जीवच मारीन अशी त्याने धमकी दिली .
या प्रकारानंतर मनसेचे प्रकाश गायकवाड यांनी पोलिस निरीक्षक शरद मेमाणे व तहसिलदार बी.एस माने यांना तक्रार अर्ज दिला आहे. दिलेल्या अर्जनुसार तलाठी यांच्या पतीवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी व सजेच्या ठिकाणी ऑफिस न चालवणार्या तलाठ्यावर निलंबनाची करवाई व्हावी असे न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल असे प्रकाश गायकवाड यांनी अर्जाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना कळविले आहे .







