त्या शिक्षकाची अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव
आटपाडी प्रतिनिधीबाळेवाडी ता.आटपाडी येथील कोळेकर वस्ती जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक बाबासाहेब शेख यांनी अटकपूर्व जामीन साठी आटपाडीच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे .
जिल्हा परिषद कोळेकर वस्ती शाळेतील सहशिक्षक बाबासाहेब शेख यांनी इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने तालुका गट शिक्षण अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवलं होते.की वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा व सहशिक्षक बाबासाहेब शेख यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
असे पत्र शिक्षण विभागास दिले होते .या घटनेनंतर बाबासाहेब शेख यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी वकिलामार्फत जामिनासाठी आटपाडी येथील न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे तर या अर्जावर 8 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
आटपाडी शिक्षण विभाग यांच्या मतानुसार त्या शिक्षकांचा दोष नाही. मग तो शिक्षक जामीनासाठी न्यायालयात धाव का घेत आहे.हा गंभीर प्रश्न आहे. आटपाडीतील शिक्षण विभाग अशा शिक्षकांना पाठीशी घालत आहे की काय ? होणार चर्चा तालुक्यामधील आहे.







