मान देशातील साहित्यिक कालिदास शिंदे व मेघा पाटील यांना गावगाडा साहित्य पुरस्कार प्रदान
वडशिवणे तालुका करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रति असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना 2022 या कालखंडातील देण्यात येणाऱ्या गावगाडा साहित्य पुरस्काराचे वितरण 10 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे वितरण करण्यात आले.
यावेळी मानदेशातील साहित्यिक मेघा पाटील यांच्या सुलवान या कादंबरीस उत्कृष्ट कादंबरी म्हणून रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान कोल्हापूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे यांच्या हस्ते मेघा पाटील यांना देण्यात आला तर दुसरे माणदेशातील साहित्यिक कालिदास शिंदे यांच्या झोळी या आत्मचरित्रास गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार कालिदास शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे बंधू नवनाथ शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार रणधीर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.







