मारहाण प्रकरणातील विद्यार्थीला न्याय मिळण्यासाठी मनसेचे मुख्यकार्यकारी यांना निवेदन
विध्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील दोषी शिक्षकावर कठोर करावी – प्रकाश गायकवाड
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील कोळेकर वस्तीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे . या घटनेबाबत मात्र पालकांनी मौन बाळगले आहे. याचे कारण त्या शिक्षकाने वरिष्ठ पातळीवरून पालकांवर राजकीय दबाव टाकला आहे . दोषी शिक्षकाने त्या विध्यार्थिनीला व तीच्या पालकांना माझ्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार करू नये अशी भीती घातली आहे .
त्यामुळे पालकांनी ही या घटनेबाबत मौन बाळगले आहे. तरी या शिक्षकाची संपूर्ण चौकशी होऊन त्या दोषी शिक्षकावर कार्यवाई करावी तसेच त्याच बरोबर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण अधिकार्यांनी जो चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर केला असेल तर त्यांच्यावरही योग्य ती करवाई व्हावी.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुका यांच्या वतीने जिल्हा परिषद समोर निष्क्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निषेध करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील .
असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदनाद्वारे दिला आहे .







