आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आटपाडी ते भिवघाट रोडवरील करगणी मधील अपघाताची कसून चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले
त्याबरोबर करगणी ते भिवघाट रस्ता बाळेवाडी क्रॉसिंगचा ठिकाणी चाळीस ते पन्नास फुटाचा अर्धवट ठेवण्यात आला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेली नाहीत त्यामुळे ते अपघात झाला व दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला त्या घटनास्थळाची पाहणी केली व आटपाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करून त्या कॉन्ट्रॅक्टर वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनेनुसार त्या कॉन्ट्रॅक्टर वरती गुन्हा नोंद झाल्याचे दिसून आले नाही
म्हणून आटपाडीच्या तहसीलदारांना निवेदन देऊन त्याची सखोल चौकशी करावी व त्यात दोषी असणारे पीडब्ल्यूडी अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर वरती गुन्हा नोंद करावा असे निवेदन त्या स्पॉट च्या फोटो सहित देण्यात आले
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, आटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड, आटपाडी तालुका वाहतूक सेना अध्यक्ष दाजी खिलारी, आटपाडी शहर अध्यक्ष श्रीकांत देशमुख सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते







