• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकच ….. शरद चव्हाण….आटपाडीतील माजी चेअरमन ढोंगी,लबाड व भ्रष्ट असून आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून…..

माणगंगा by माणगंगा
September 20, 2023
in सांगली
0
प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकच ….. शरद चव्हाण….आटपाडीतील माजी चेअरमन ढोंगी,लबाड व भ्रष्ट असून आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून…..

प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकच ….. शरद चव्हाण….
आटपाडीतील माजी चेअरमन ढोंगी,लबाड व भ्रष्ट असून आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून…..


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडीतील प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू. टी.जाधव हे ढोंगी लबाड व भ्रष्टाचारी आहेत. हे पदावर असताना अनेक घोटाळे झाले आहेत. ते घोटाळे समोर येऊ नयेत, म्हणून शिक्षक बँकेच्या विरोधात मोर्चे काढणे विरोधात बोलणे असे उद्योग सुरू आहेत.

शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने वर्षभर झोपलेले सर्व विरोधक आज जागे झालेले आहेत. आणि पुन्हा थोड्या दिवसांनी ते झोपी जाणार आहेत. मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात ज्यांना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील साध्या खुर्च्या सुद्धा बदलता आल्या नाहीत, काळानुरूप बँकेचे रूप बदलले नाही आणि बँकेमध्ये कोणतीही विकासाची गोष्ट न करता डिव्हिडंट मात्र शून्य आणि एक दोन टक्के देत राहिले तेच सर्व भ्रष्ट, लबाड आणि ढोंगी विरोधक शिक्षक बँकेच्या कारभारावर चुकीचे आरोप करत सुटले आहेत. शिक्षक बँकेतील सर्व सभासद हे सुज्ञ,सुशिक्षित आणि अभ्यासू आहेत, सर्व सभासदांचे बँकेच्या कारभारावर अतिशय बारकाईने लक्ष आहे, व्याजदर कमी केल्यामुळे प्रत्येक कर्जदार सभासदाचा मोठा आर्थिक फायदा झालेला आहे. निवडणुकीनंतर सत्ता बदल झाल्यानंतर कर्ज आणि ठेवी यातील तफावत कमी झाल्याने बँकेचे आर्थिक उत्पन्न कमी होऊन सुद्धा आर्थिक बचतीचे नियोजन केल्याने यावर्षी नफ्यामध्ये वाढ झालेली दिसत आहे.

ज्यांना दहा वर्षात व्याजदर कमी करता आले नाहीत, चांगला लाभांश सभासदांना देता आला नाही, मुख्य शाखा इमारत बांधकामासाठी दोन वेळा ठराव करूनही एक रुपया त्यासाठी तरतूद केली नाही ते केवळ एक वर्षामध्ये सत्ताधारी मंडळींना लाभांश आणि व्याजदरासाठी जाब विचारत आहेत आणि सभासदांना ओरडून खोटी माहिती सांगत आहे. सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाने मुख्य कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. ठेवीच्या व्याज दरात वाढ केली आहे. याचा परिपाक म्हणून सभासद संख्येमध्ये 568 ने वाढली आहे.

सभासदांचा शिक्षक बँकेवर विश्वास दृढ होत चाललेला आहे. इतक्या सकारात्मक गोष्टी घडत असताना आटपाडीच्या माजी चेअरमनना कावीळ झाल्याप्रमाणे सर्व पिवळे दिसत आहे.बोलघेवडे आटपाडीचे माजी चेअरमन हे ढोंगी, लबाड शिक्षकांना गोड बोलून फसवणारे भ्रष्ट नेते आहेत. येणाऱ्या काळात मागील दहा वर्षात बँकेत केलेल्या संपूर्ण भ्रष्ट कारभाराची चौकशी करून चुकीचे आर्थिक व्यवहार केलेल्यावर कठोर कारवाई करण्याचे नियोजन केल्याचे शरद चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आटपाडीच्या हेच भ्रष्ट माजी चेअरमन आपल्या सोबत असलेल्या सहकार्यांना लाथाळून स्वतः निमंत्रक पद स्वीकारून पुन्हा शिक्षक बँकेत प्रवेश करण्यासाठी केविलवाणी धडपड करत सुटले आहेत.येणाऱ्या 24 तारखेला स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सत्ताधारी संचालक मंडळ अतिशय शांतपणे सभासदांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देण्यास बांधील असून त्यासाठी विरोधकांनी सभा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे असे आव्हान संचालक श्री. शरद चव्हाण यांनी केले.

मा. चेअरमन विनायकराव शिंदे, व्हा. चेअरमन सौ अनिता काटे मॅडम व सर्व संचालकांच्या नियोजनातून निवडणुकीपूर्वी दिलेला जाहीरनामा 5 वर्षात 100% पूर्ण करण्यास स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ कटिबद्ध आहे हेही त्यांनी स्पष्ट केले.

Views: 187
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घ्यावा-सरपंच राणी गोरड

सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घ्यावा-सरपंच राणी गोरड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)