विट्यात धनगर समाजाचा मोर्चा
चौंडी येथे सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विट्यात धनगर समाजाचे नेते राजूशेठ जानकर यांच्या नेतृत्वाखाली......धनगर समाज कृती समितीच्यावतीने विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
विटा येथील बिरोबा मंदिरापासून सकाळी मोर्चाला सुरूवात झाली. सकाळी धनगरी ढोलांच्या निनादात मोर्चा मायणी रस्ता, चौंडेश्वरी चौक मार्गे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आंदोलकांनी ढोलाच्या गजरात घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, ओबीसी नेते संग्राम माने, संदीप ठोंबरे, गजानन सुतार यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी राजूशेठ जानकर म्हणाले, २०१४ साली आम्ही बारामतीमधील आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी सतांतर झाल्यानंतर पहिल्या कॅबीनेट बैठकीत धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कितीतरी कॅबीनेट बैठका झाल्या. परंतू आर क्षण देण्यात आले नाही. आताही सरका रमध्ये आपले चार आमदार आहेत. त्यांनी सरकारची बाजू मांडू नये. त्या लोकप्रतिनिधींनी समाजाची बाजू मांडल्यास धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल.
यावेळी परमेश्वर कोळेकर, संजय विभूते, संग्राम पाटील, गजानन सुतार, संदीप ठोंबरे, संग्राम माने यांची भाषणे झाली. या मोर्चामध्ये भाऊसाहेब पाटील, शिवाजी हारुगडे, भरत लेंगरे, किसन जानकर, सुनील मेटकरी, प्रताप कचरे, बाळासाहेब मेटकरी, संदीप मेटकरी, सागर पाटील, पै. राहुल रुपनर, तेजस लेंगरे, बंडू कातुरे, शशिकांत तरंगे, सुभाष मेटकरी, युवराज मेटकरी, सूर्यकांत मेटकरी, रवींद्र ठोंबरे, संजय पाटील, अधिक धडस, शंकर पाटील, दिलीप काळेबाग यांच्यासह समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.







