कोळेकरवस्ती जि. प. शाळा विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी तिसऱ्यांदा चौकशी समिती गठन…..दोन वेळा समितीने अहवाल गुंडाळला
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावाच्या हद्दीतील कोळेकरवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थिनीस शिक्षकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती .या घटनेच्या संदर्भात जिल्हा शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी आटपाडी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते .मात्र या चौकशी समितीमध्ये असलेले सदस्य हे सदरच्या घटनेवर पडदा टाकण्यामध्ये पुढे होते .असा आरोप झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा चौकशीचे आदेश देण्यात आले होते .
या चौकशी समितीमध्ये तासगावचे गटशिक्षणाधिकारी, व कवठेमंकाळचे गटशिक्षणाधिकारी व मुख्यालयातील विस्ताराधिकारी यांची समिती नेमण्यात आली होती.
या समितीने 15 सप्टेंबर रोजी शाळेला भेट देऊन चौकशी केली होती, मात्र यावेळी आक्षेप घेणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी कडे चौकशी करण्याऐवजी दुसऱ्याकडेच चौकशी करून पुन्हा अहवाल गुंडाळला होता हे लक्षात आल्यावर प्रसार माध्यम प्रतिनिधींनी बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमीसे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्यानंतर सी. ई.ओ. यांनी जिल्हा उप शिक्षणाधिकारी विमल माने यांच्या अध्यक्षतेखाली नवीन चौकशी समिती नेमली आहे.
या घटनेवर वारंवार आवाज उठवणारे प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी राजू शेख, विक्रम भिसे, प्रशांत देशमुख, अशोक पवार, शाहीन शेख, हबीब मुलांनी, अल्ताफ खतीब सामाजिक कार्यकर्ते गणेश जुगदर, प्रकाश गायकवाड सत्यवान पिंजारी इत्यादींनी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व विस्ताराधिकारी आठवले यांची भेट घेऊन घटने संदर्भात असलेले चलचित्र चित्रफित दाखवून वस्तुनिष्ठ चौकशी करण्यासंदर्भात मागणी केली आहे.
चौकट…. असे काय प्रकरण आहे.अनेक शिक्षकांनी,अधिकाऱ्यांनी व अन्य मंडळीनी हे प्रकरण दाबण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी गुरुजी विद्यार्थ्यांना मारहाण करून पुन्हा प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी तालुक्यात सर्व शिक्षण विभाग एकत्र येतोय.. म्हणजे विद्यार्थिनीला मारहाण करणारे शिक्षक निश्चितच दोषी आहेत…







