आबासो कोकरे,चंद्रकांत पावणे,विवेक पावणे )
धनगर समाजाचे दैवत. संघर्ष योद्धा ..आम्. गोपीचंद पडळकर ..यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शब्दांकन पत्रकार ..सदाशिव पुकळे…..
(आबासो कोकरे,चंद्रकांत पावणे,विवेक पावणे )
धनगर समाजाचे दैवत व संघर्ष योद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
गाव-गाड्यातील माणसं यांना वेगळेच वैशिष्ट्य असते, ग्रामीण भागामध्ये जीवन जगताना रोज नव्या संकटाशी सामना करत माणसं जगतात, अशाच एका खेड्यातील तरुणानेन अनेक संकटाशी सामना करून आपल्या गावाला इतिहास प्राप्त करून नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

माणदेश पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात वसलेले जवळपास दीडशे उंबरा असणारे गाव म्हणजे पडळकरवाडी होय. संपूर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबून असलेले, परंतु दुष्काळाच्या झळा सोसत इथली माणसं कशीबशी जगत असतं, शेतीबरोबर मेंढपाळाचा व्यवसाय असल्यामुळे मेंढ्यांना जगविण्यासाठी भटकंती करत अनेक लोक गावाबाहेर पडली. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करून कष्टाने आणि प्रामाणिक राहून स्वतःच्या लेकरा- बाळांना शिक्षणाचे दूध पाजत राहिली.
शिक्षणाचे हेच अमृत पिऊन इथली मुलं मुली वाढली आणि नव्या उमेदीने जिद्दीन आणि चिकाटीने शिकली. रात्रंदिवस अभ्यास करून मुलं पहिल्या नंबरात येऊ लागली .चढाओढीने शिकता शिकता या छोट्याशा वाडीतील पहिला मुलगा उत्तमराव पडळकर डॉक्टर झाला.आणि बघता या छोट्याशा वाडीतील शंभरहून अधिक मुलं डॉक्टर झाली. आणि याच पडळकरवाडी गावाला डॉक्टरांची पडळकरवाडी म्हणून ओळख निर्माण झाली.
…या गावाला शिक्षणाचा गंध लागला आणि नवा इतिहास निर्माण झाला…..
ज्ञानाचे ज्ञानामृत पिऊन या छोट्याशा गावातील अनेक मुलं मुली शिकून गावच्या वैभवात भर टाकत राहिली आज याच वाडीत कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर कोणी डी फार्मसी बी फार्मसी, वकील होऊन मोठमोठ्या हुद्यावर काम करीत आहेत. शिक्षणाच्या जोरावर वाडीतील लोकांच्या जीवन जगण्याचा दर्जा उंचावला अन आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले.
विविध माध्यमातून गावचा कायापालट होत असताना जसं मातीतून नवा अंकुराचा जन्म व्हावा तसा कुंडलिक आणि हिराबाई पडळकर या दापत्याच्या पोटी रत्न जन्माला आले. त्या रत्नाचे नाव म्हणजे गोपीचंद होय ….एका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा मुलगा म्हणजे कुंडलिक पडळकर यांचा मुलगा गोपीचंद पडळकर होय .
…सध्याचे महाराष्ट्र राज्यातील चर्चेतील विधान परिषदेचे विद्यमान आमदार.. म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर साहेब होय…
माननीय गोपीचंद पडळकर यांचा जन्म दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पडळकरवाडी येथे झाला लहानपणापासून आई-वडिलांनी कष्टातून दिवस काढल्यामुळे परिस्थितीची चांगलीच त्यांना जाण होती .अगोदरच गावाला डॉक्टर होण्याची परंपरा असल्यामुळे आपणही जिद्दीने शिकून आई-वडिलांचे नाव मोठे करून या परंपरेचा आणखी एक भाग होऊन दाखवावे असे मनी ठरवून शिक्षण घेण्यास सुरुवात झाली. शाळेत जीवनापासून विविध गुण कौशल्य अंगी निर्माण होत गेले, शिक्षण घेत असतानाच लढाऊ वृत्ती निर्माण झाली आणि नियतीला एक वेगळेच व्यक्तिमत्व लाभत गेले.
शिक्षणाचा खरा उद्देश सार्थ ठरवत शिक्षणापासून शहाणे होत जाऊन अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून तरुणांना जागे करत नव्या ताकतीचा संघर्ष उभा केला तो संघर्ष योद्धा म्हणजे गोपीचंद पडळकर याच नावाचा व्यक्ती होय.
..कष्टाने हाल होतात परंतु हार होत नाही ..
आम्. पडळकर यांचे वाक्य तरुणांच्या कानी पडल्यामुळे खेडोपाडीचा तरुण जिद्दीने आणि चिकाटीने पेटून उठला. अन्यायविरुद्ध लढण्यासाठी तरुणांनी राजकारणाकडे पारंपारिक पद्धतीने न पाहता राजकारणाची दिशा आपण बदलू शकतो हा ठाम विश्वास त्यांच्यात निर्माण केला.
सन 2007 पासून राजकीय जीवन संघर्षाला सुरुवात झाली 2007 पासून झालेल्या विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी केली. जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा अशा अनेक निवडणुकीमध्ये उमेदवारी घेऊन त्या त्या निवडणुका मोठ्या जिद्दीने चिकाटीने ताकतीने लढवल्या. मी निवडणुका केवळ यश मिळावे म्हणून लढवत नसून व्यवस्थेचे परिवर्तन व्हावे म्हणून मी निवडणूक लढवीत आहे, असे वारंवार सांगत पडळकर साहेबांनी खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात नवा लढा पुकारला होता
तसे पाहता राजकीय जीवनाशी वाटचाल करीत असताना प्रस्थापितांनी अनेकदा विविध प्रकारे पडळकर साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला .परंतु कष्ट करणाऱ्या माऊलीचा मुलगा हरणार कसा मनामध्ये संघर्षाची ज्योत कायम ठेवत प्रस्थापितांच्या व्यवस्थेविरुद्धचा लढा आणखी तीव्र करून फक्त जिल्ह्यापुरते नाही तर संपूर्ण राज्यात खरा संघर्ष योद्धा म्हणून नावलौकिक निर्माण केला.
परिवर्तनाची हाक —
खानापूर आटपाडी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना सामान्य माणसाची नाळ जोडलेला नेता म्हणून ओळख निर्माण झाली. यातूनच सामान्य लोकांचे अनेक प्रश्न समोर येऊ लागले सर्वजण पडळकर साहेबांच्याकडे नव्या आशेचा किरण म्हणून पाहू लागले याचाच एक भाग म्हणून गरीब ,दलित ,शोषित पीडित ,मागास लोकांच्या मनात परिवर्तन झाल्याशिवाय तो सामान्य माणूस बंड करणार नाही.
यासाठी सन 2013 साली परिवर्तन रॅली हा रथ संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक खेडोपाडी फिरवला यातून परिवर्तन नेमके कशासाठी आणि का ? यासाठी तरुणापासून वृद्धापर्यंत सर्वच पुरुष माता भगिनींच्या बैठका घेऊन व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश समजावून सांगण्यात आला .सारे जण एकत्र येऊन लढलो तर आणि तरच प्रस्थापिता विरोधात ची लढाई आपण जिंकू शकतो हा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला.
यातूनच अनेक तरुण मित्र विविध समाज घटकातील नेते पुढारी सर्वजण पडळकर साहेबांचे नेतृत्व मान्य करून एक होऊ लागले .आणि आपण सुद्धा व्यवस्थेच्या एक भाग होऊ शकतो असा ठाम विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. परिवर्तन रॅलीची सांगता सभा विटा शहरात विराट सभेने झाली तात्कालीन आणि आज सुद्धा सर्वांच्या मनात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून ही लाट कायम राहून पडळकर साहेबांच्या नेतृत्वाला साथ देत आहेत.
संघर्ष पाण्यासाठी
कायम दुष्काळी पट्ट्यात असलेला आटपाडी तालुका आणि येथील लोकांना पाण्यासाठी करावा लागलेला संघर्ष अजूनही शमलेला नाही. प्रत्येकाच्या शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी आरोळी पडळकर साहेबांनी दिली आणि सर्वांचे लक्ष साहेबांच्या संघर्षाकडे लागले बांधापर्यंत पाणी आल्याशिवाय आपल्याला गप्प बसून चालणार नाही आणि पाणी हे केवळ अर्ज विनंती करून मिळणार नाही हे समजल्यानंतर तरुणांच्या हाकेला ओ देत कराड येथील टेंभूचे ऑफिस फोडल्यानंतर सर्व प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घातल्यावर जागे व्हावे तसे जागे झाले. केवळ पाण्यावर राजकारण करून सत्ता भोगणाऱ्या सत्तापितांना कळून चुकले आता गोपीचंद पडळकर शांत बसणार नाहीत वाटेल ते झाले तरी चालेल परंतु संघर्ष थांबणार नाही हे प्रस्तापितांच्या लक्षात आल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घ्यावा लागला
अपूर्ण राहिलेली कॅनॉलची कामे पूर्णता कडे जाऊ लागली तर नंतर काही वर्षातच शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले.
रानात पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ लागले वृद्ध शेतकरी सुद्धा पडळकर साहेब दिसतास गळ्यात पडून रडू लागला. शेतकऱ्यांच्या पोराला शेतकऱ्यांची जाण राहिली असे म्हणून सर्वजण धन्यवाद देऊ लागले तर पाण्यासाठी सत्ता जेलमध्ये जाऊन शेतीला न्याय देणारा शेतकऱ्यांना आधार देणारा नेता म्हणून पडळकर साहेबां कडे नव्या उमेदीने शेतकरी पाहू लागला…..
आरक्षणाचा लढा
ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाचे मी देणे लागतो हे प्रामाणिक पणा मनात ठेवून प्रलंबित राहिलेल्या आरक्षणाचा लढा संपूर्ण राज्यभर तेवत ठेवला. संपूर्ण धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने गावोगावी तालुक्यातून जिल्ह्यातून बैठका घेऊन आरक्षणाची एक चळवळ उभा केली.

राजकीय गटतट बाजूला ठेवून आरक्षण हा एकच मुद्दा सर्वांनी डोळ्यापुढे ठेवून लढावे याच एका हेतूसाठी सर्वांना एकत्रित करून स्वतःची पर्वा न करता रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून पडळकर साहेब आरक्षणाच्या दृष्टीने सर्वांना एकत्रित करू लागले. आरक्षणाच्या लढ्याखाली सर्व समाज बांधवांना न्यायालयीन लढा बरोबरच चळवळ ही करावी लागेल आणि ती सर्वांनी एकत्रितपणे करावी यासाठी सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आपला हक्क मागू लागले. या सर्वांचे नेतृत्व होते ते म्हणजे गोपीचंद पडळकर होय…
कोणत्याही परिणामाची परवा न करता माझ्या समाजाला न्याय मिळावा या हेतूसाठी ते झटले त्यातच परिणाम म्हणून तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून 1000 कोटीच्या विविध प्रकारच्या योजना धनगर समाजाला लागू कराव्यात यासाठी निर्णय घेण्यात आला. केवळ योजना दिल्या म्हणून लढा संपला असे होणार नाही. असे ठामपणे सांगत जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने संपुष्टात येणार नाही. तोपर्यंत मी समाजासाठी रात्रंदिवस लढतच राहील हा ठाम विश्वास तरुणांच्या मनामध्ये निर्माण करून एक गुणवान नेतृत्व म्हणून नावारूपाला आले ते म्हणजे गोपीचंद पडळकर होय…..
बहुव्यायामी नेतत्त्व
आई हिराबाई यांच्या पोटी जन्मलेला चमकणारा हिरा म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर होय, वडिलांचे छत्र हरवल्यानंतर ज्या माऊलीने आपल्या मुलाला जे संस्कार दिले ते कौतुकस्पद आहेत, धाडसी कुशल आणि सर्वांचा विचार करणारे हेच ते नेतृत्व आज राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक विकासाची मुळे ही ज्या मातीत रुतली आहेत त्या मुळाशी मी घट्ट बांधलो गेलो आहे असे ठामपणे सांगणारा नेता म्हणून आदरणीय साहेबांच्या कडे पाहिले जाते
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी रडून नाही तर लढूनच सामना करावा लागतो हे पडळकर साहेबांच्याकडे पाहिल्यावर समजते आज संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष योद्धा म्हणून माननीय पडळकर साहेबांचे नाव घेतले जाते. विश्रांती घेणे मला मान्य नाही आज जर मी विश्रांती घेतली तर संपूर्ण समाज खितपत पडेल त्यामुळे मला सतत नव्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे असे ठामपणे विचार मांडत असतात, याच विचाराने प्रेरित होऊन गावातील लहानापासून थोरापर्यंत पडळकर साहेब जोडले गेले आहेत
असा कोणताच प्रश्न नाही ज्याचे उत्तर पडळकर साहेबांच्याकडे नाही. शोषित ,पीडित ,गरीब, वंचित ,मागास सर्वच समाज घटकातील लोकांना न्याय देणारे आणि त्यांच्या प्रश्नाची आपुलकीने विचारपूस करणारे नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर होय…..
अशा बहुजनांचे नेतृत्व असणाऱ्या नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
*तू हात दे, मी साथ देतो. तू चाल पुढे मी आधार देतो. असे म्हटल्यावर प्रत्येक तरुण म्हणतो की एकच छंद गोपीचंद
गाजलेले प्रश्न व आंदोलने —-
1)धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा .
2)एमपीएससी यूपीएससीचे आंदोलन.
3)ऊसतोड कामगारांचा लढा
4 )बैलगाडा शर्यत आंदोलन
5 )एसटी कामगारांचा लढा
6 )राज्यभर घोंगडी बैठक
7) सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचा शस्त्रधारी पुतळा बसवावा यासाठी राज्यपालाकडे मागणी
8 )बहिर्जी नाईक स्मारक सुशोभीकरणासाठी निधी
9) वीर शिवा काशिद स्मारक सुशोभीकरणासाठी निधी 10) आटपाडी तालुक्यात एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्न
11) टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आंदोलनाच्या रूपाने भाग पाडले
12) शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी प्रयत्न
13 ) विविध विकास कामासाठी निधीचा वर्षाव
14) मेंढपाळाच्या चाऱ्यासाठी फॉरेस्ट खुले करण्याची विधानसभेत मागणी
15) कोकणातील धनगर वाद्यांना सुख सुविधा पूर्वीनेसाठी विधान सभेत आवाज
16)धनगर समाजाच्या विकासासाठी 1000 कोटीचा निधी मिळण्यासाठी विधानसभेत आवाज
शब्दांकन पत्रकार ..सदाशिव पुकळे…..







