लेखिका,गीतकार कु सुपेकर हिची बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास भेट
पुणे
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास -कु. सुपेकर हिची आज 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 7.वाजता आवर्जून भेट झाली असता.सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी माझी पूर्वी पासूनची ईच्या होती की महापुरूषांच्या जीवनावरील कथानक वापरून लहान मुलांना उपयुक्त परिवर्तनाची दिशा व विचार देणारा लघुपट तयार केला पाहिजे त्यासाठी मला आपली चांगलीच मदत होईल तसेच आपण गीते तयार करीत आहे
ही तर त्यावरून मोठी आनंदाची गोष्ट आहे म्हंटले.फुले दाम्पत्याची गाणी पण लोकांच्या मनावर भीमगीता सारखी रुळतील असे मी नक्कीच प्रयत्न करेन आणि दीनांची साउली लघुपट देखील स्क्रिप्ट बनविते त्यासाठी आपण मला आज भेट दिलेली दीनांची साउली ,महात्मा फुले गीत चरीत्र,माझे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले असे तीन ग्रंथ नक्कीच या कामी उपयोगी पडतील.
बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे आशा ढोक हिने तिचे स्वागत केले.
व आमच्या जवळच रहाणारी सुकन्या सुपेकर भेटून फुले आंबेडकर चळवळीच्या गप्पा ,पुढील कार्य यावर छान गप्पागोष्टी झाल्याने कार्यालयाचे वातावरण आज आनंदीमय झाले.या भागात पुन्हा 17 वर्षानंतर रहाण्यास येऊन देखील जुन्या आठवणी ओळखी चा नव्याने उपयोग होऊ लागला.कु.सुपेकर कडून असेच उत्तरोत्तर चांगले कार्य घडो अशी सदीच्या व्यक्त करीत पुढील भेटी साठी व कार्यासाठी आपण एकत्र काम करू असे एकमेकांना शुभेच्छा दिल्या.सत्य की जय हो.







