विद्यार्थिनी मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी.. अश्विनी कासार
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील कोळेकरवस्ती येथील विद्यार्थिनी मारहाप्रकरणी सखोल चौकशी करावी व दोषी वर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अश्विनी कासार यांनी चौकशी समितींकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की कोळेकरवस्ती येथील जि.प.शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण झाले प्रकरणी सखोल आणि निरपेक्ष चौकशी करून पिडीत विद्यार्थ्यांनीला न्याय मिळावा .आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणे करून पुन्हा कुठेही असे प्रकार होऊ नये .अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा चौकशी समितीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष अश्विनी कासार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.







