ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक नामनिर्देशानाची वेळ आता 5 वाजेपर्यंत
आटपाडी प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे परंतु पूर्वी अर्ज भरण्यासाठी तीन वाजताची मुदत होती ती आता पाच वाजेपर्यंत मुदत करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतींच्या मुदत संपण्यापूर्वी निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे;
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०३/१०/२०२३ रोजी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक १६/१०/२०२३ ते दिनांक २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार दिनांक १६/१०/२०२३ पासून संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणकप्रणालीव्दारे भरले जात आहे मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे.
सबब दिनांक १८/१०/२०२३ ते दिनांक २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशानाची सकाळी ११.०० ते दु. ३.०० वा. पर्यंतची वेळ होती ती आत्ता सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.







