दिघंची बसस्थानकास २५ लाख निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या आम् पडळकरांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित …ॲड. विलास देशमुख
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता. आटपाडी येथे सुसज्ज सर्व सोयी नियुक्त नवीन बस स्थानक होत नसलेचे निषेधार्य ॲड. विलास देशमुख यांचे नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
त्याप्रमाणे बुधावरी सकाळी १० वाजता जुन्या पाडण्यात आलेल्या एस.डी. स्टॅन्ड जवळ ग्रामस्थ उपोषणास बसले होते. उपोषण च्या ठिकाणी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भेट दिली व उपोषणाला बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली व तेथूनच थेट आमदार गोपीचंद पडळकर यांना फोन केला व येथील बसस्थानकाच्या परिस्थितीची माहिती दिली.
त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगेच 25 लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले अशी माहिती माझी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी उपोषणच्या ठिकाणी जाहीर केले.यावेळी आटपाडी आगार प्रमुख राहुल देशमुख उपस्थित होते.
दिघंची गावात सुसज्ज सर्व सोयीनियुक्त बसस्थानकाचे काम करून विद्यार्थ्यांच्या एसटी पासेचे आरक्षण कार्यालय,, कॅन्टीन, तसेच महिला व पुरुष यांना अद्ययावत शौचालय सुरु करावे अशी उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी होती. या उपोषणात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता
यावेळी बोलताना उपोषण करते उपोषण करते ॲड. विलासराव देशमुख म्हणाले की यापूर्वी आ. अनिल बाबर यांच्या फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे व आता आ. गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून 25 लाख निधी मिळाल्यास दोन्ही मिळून 35 लाख रुपये निधी मिळाल्यास या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाण्यास मदत होईल मात्र दोन आमदारांच्या फंडातून निधी मिळाल्यामुळे भविष्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात यावी
उपोषण स्थळी माजी सभापती जयमाला देशमुख, बाळासाहेब होनराव, अतुल यादव, अजित गोडबोले, सावंता पूसावळे बाळासाहेब मोरे, ज्योतीराम काटकर, संतोष मोरे, यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता.
यावेळी महिला उपोषणकर्त्या पूजा गुरव, उज्वला जावीर, बाळाबाई रणदिवे, हेमलता रणदिवे, वैशाली सरताळे, दीप्ती गवळी, नीलम रणदिवे, प्रभा ताई रणदिवे
तसेच पुरुष उपोषणकर्ते शेखर रणदिवे, प्रमोद गुरव, ऋतुराज देशमुख, केवळ कवडे, नवनाथ रणदिवे, लखन तुपे, जयवंत रणदिवे, महेश देशमुख आदींनी उपोषण केले







