• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रा. आर. एच. पाटील आदर्श प्राचार्य पुरस्कारांनी सन्मानीतमहाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन,सोसायटी च्या वतीने गौरव.आटपाडी प्रतिनिधी

माणगंगा by माणगंगा
October 19, 2023
in सांगली
0
प्रा. आर. एच. पाटील आदर्श प्राचार्य पुरस्कारांनी सन्मानीतमहाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन,सोसायटी च्या वतीने गौरव.आटपाडी प्रतिनिधी

प्रा. आर. एच. पाटील आदर्श प्राचार्य पुरस्कारांनी सन्मानीत
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन,सोसायटी च्या वतीने गौरव.
आटपाडी प्रतिनिधी

झरे ता.आटपाडी येथील पद्मभूषण डॉ.क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य, राजाराम हरी पाटील यांना अहिल्यादेवी होळकर आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी,सांगली या संस्थेचा हीरक महोत्सव सांगता समारंभ धनंजय गार्डन सांगली येथे उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य आ. सुरेशभाऊ खाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हुतात्मा संकुल, वाळवा चे मार्गदर्शक.वैभवकाका नायकवडी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.


संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आ.गोपीचंद पडळकर, आ. सुमनताई पाटील, बाळासाहेब कर्णवर पाटील, व्हा. चेअरमन, श्रीमती एल. टी. शेंडगे, सचिव, एस. ए. पाटील, खजिनदार, एस. व्ही. अनुसे, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श प्राचार्य पुरस्कार संस्थेच्या पद्मभूषण डॉ.क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय,झरे चे प्रभारी प्राचार्य, राजाराम हरी पाटील यांना देऊन गौरवण्यात आले.


सन 2015 – 16 पासून प्रा. राजाराम पाटील यांनी पदभार स्वीकारला. संस्थेचे विद्यमान चेअरमन, आर. एस.चोपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्य, राजाराम पाटील व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप चांगले काम केले. सन 2009 पासून महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू झाले. अत्यंत ग्रामीण, दुष्काळी भागातील महाविद्यालयाने अल्पावधीत नावलौकिक मिळवला. सन 2019 – 20 ते 2022 – 23 मध्ये सलग चार वर्षे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे गुणवत्ता शिष्यवृत्तीत कला विद्याशाखेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


आतापर्यंत 84 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. कु. संध्याराणी नलवडे, कु.अश्विनी भंडारे, पुराणलाल भंडारे, कु.कोमल सावंत, व कु. शुभांगी माने या विद्यार्थ्यानी तत्वज्ञान विषयात सुवर्णपदक मिळवले आहे. कु. अश्विनी भंडारे व कु. कोमल सावंत या दोघींनी शिवाजी विद्यापीठात सामाजिकशास्त्र विषयात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ज्ञानेश्वर मुळे एक्सलन्स अवार्ड प्राप्त केले आहे. कु. श्वेता आबासाहेब यादव हिने शिवाजी विद्यापीठात मराठी विषयात सुवर्णपदक मिळविले आहे. ती सहा पारितोषिकाची मानकरी ठरली. तिला शिवाजी विद्यापीठाकडून गौरवण्यात आले.


कु. वर्षा पाटील व कु.भाग्यश्री कदम या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत दिली जाणारी बॅरिस्टर पी.जी.पाटील शिष्यवृत्ती प्राप्त केली. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामार्फत ‘अभिवादन स्वातंत्र सैनिकांना’ या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातून कु. संजीवनी खिलारी व कु. स्वप्नाली पवार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु. वासंती पारेकर प्रथम क्रमांक प्राप्त केला.


गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्रातही उज्वल यश संपादन केले.कुस्तीमध्ये श्री संतोष गावडे व मयूरसिंह मोरे या दोघांनी ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. श्रीकांत निकम यांने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत बुलेट गाडीचा मानकरी ठरला.
अशा अनेक उपक्रमात सहभाग घेऊन महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सुसंस्कारित शिक्षण देणारे ग्रामीण भागातील महाविद्यालय म्हणून आदर्श निर्माण केला. त्यासाठी संस्थेचे विद्यमान चेअरमन, आर. एस. चोपडे, पदाधिकारी, सर्व संचलक व सल्लागार मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय कायमविनाअनुदानित असून सुद्धा प्रभारी प्राचार्य, आर. एच. पाटील व सर्व स्टाफ तुटपुंजा मानधनावर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन संस्थेने प्रभारी प्राचार्य आर एच पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
,……………….
आदर्श प्राचार्य पुरस्कार हा सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विनाअनुदानित काळात केलेल्या कष्टचे फलित आहे. संस्थेने दिलेला सन्मान आयुष्यभर स्मरणात राहील.

  • प्रभारी प्राचार्य आर. एच. पाटील
Views: 165
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महिला शेतकरी शेतीशाळा चा शेती दिन उत्साहात

महिला शेतकरी शेतीशाळा चा शेती दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)