• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

उत्तम गुरुजींच्या कमाची चौकशी करावी. पत्रकार अशोक पवार,प्रशांत देशमुख यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

माणगंगा by माणगंगा
October 20, 2023
in सांगली
0
उत्तम गुरुजींच्या कमाची चौकशी करावी. पत्रकार अशोक पवार,प्रशांत देशमुख यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

उत्तम गुरुजींच्या उत्तम कामाची चौकशी करावी. पत्रकार अशोक पवार,प्रशांत देशमुख यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंगेवस्ती येथे नियुक्त असलेले शिक्षक उत्तम तायाप्पा जाधव यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी पत्रकार अशोक पवार व प्रशांत देशमुख यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती अशी की दिनांक 7 सप्टेंबर रोजी उत्तम गुरुजींनी स्वतः फोन करून आम्हा पत्रकारांना भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार आम्ही दुपारी 3 ते 4 दरम्यान आटपाडी दिघंची रोडवरील जाधव महाराज मठ येथे उत्तम गुरुजी यांना भेटलो होतो.


त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा कोळेकरवस्ती येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीला झालेल्या मारहाणीच्या बातम्या थांबवा तुम्हाला जाहिरात देतो ,असे अमिष दाखवले होते. परंतु आम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही व त्यांचा प्रस्ताव धुडकवल्याने त्यांनी त्यांचे पत्रकार मित्र यांच्या मदतीने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही दिनांक 13 सप्टेंबर रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यासोबत झालेले संभाषण व त्यांच्या सोबत झालेली चर्चेचा व्हिडिओ पोलिसांना दाखवून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार अर्ज दिला आहे.


सदरचा तक्रार अर्ज अद्याप प्रलंबित आहे. परंतु उत्तम गुरुजी जाधव या शिक्षकांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी बदनामीची भीती दाखवून खंडणी मागणी प्रकरणी अनाधिकृत पोर्टल आणि तोतया पत्रकार विरोधात पुन्हा नोंद करणे बाबत खोटा तक्रार अर्ज दिला आहे.या अर्जाच्या आधारे स्थानिक वृत्तपत्र व वेबसाईट आणि युट्युव माध्यमातून बातम्या प्रसिद्ध करून आमची बदनामी केली आहे. सदर गुरुजी उत्तम जाधव हे आम्हा पत्रकारांना भेटण्यासाठी आले होते.दिनांक 7 सप्टेंबर रोजी लिंगे वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये हजर असताना दुपारी 3 ते 4 या वेळेत आटपाडी दिघंची रोडवरील जाधव महाराज मठ येथे आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सिओ आटपाडी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेत होत्या . म्हणजे शाळेत पण हजर व जाधव मठात पण हजर होते.


जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी तालुक्यामध्ये आहेत. याची सुद्धा त्यांना भीती नाही. त्याचबरोबर आम्हा पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांना अनेक फोन आले त्यामधील एक फोन होता त्या फोनला उत्तर देत असताना ते म्हणत होते की मी ऑफिसमध्ये आहे. दुसऱ्या एका फोनला उत्तर देताना चार्जशीट संध्याकाळी वाचायला मिळणार आहे. म्हणजे हे शिक्षक पत्रकारांच्या समोर बसल्याबसल्या अर्ध्या तासाच्या वेळेत अनेक लोकांना वेगवेगळी माहिती देतात तर मग त्या दिवसाची त्यांची शाळेत हजेरी कशी काय लागली.


त्याचवरोवर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सर्व संघटना समन्वय समिती शिक्षकांना एकत्र करून पत्रकारांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत असताना उत्तम जाधव यांच्या सोबत अन्यही काही शिक्षक दिसत आहेत .सदर प्रकरणात बाकी शिक्षकांचा काय संबंध आहे. असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे सोबत असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा गैरवर्तन करत आहेत असे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे त्यामुळे या शिक्षकांना सुद्धा याचा खुलासा विचारावा.

उत्तम जाधव गुरुजी हे आपली ओळख शिक्षक नेते म्हणून करून देत आहेत. शिक्षकांचे प्रश्न व अडीअडचणी सोडवण्याचे कार्य करत असतात असे ते स्वतः मान्य करतात. हे शिक्षक मागील दहा वर्षामध्ये शिक्षक बँकचे चेअरमन होते. विद्यमान संचालक त्यांच्याबरोबर ते राजकारणात सक्रिय असतात मग यांची नियुक्ती शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करण्यासाठी आहे की राजकारण करण्यासाठी त्यांना नियुक्त केले आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

आम्हा पत्रकाराबाबत तोतया असा उल्लेख करतात आमच्या विरोधात धमकी खंडणी ब्लॅकमेलिंग असा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देतात जर यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपासंदर्भात पुरावे असतील तर पोलिसांना सादर करावेत व त्यांना त्यांचे काम करू द्यावे त्यांची बदनामी झाली आहे असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करून रीतसर न्याय मागावा.

मागील अनेक वर्षांपासून त्यांना नेमून दिलेलं कर्तव्य कमी व राजकारणामध्ये जास्त व्यस्त असतात ते शिक्षकांना एकत्र करून अनेक वेळा आंदोलन करताना पाहायला मिळतात. अनेक राजकारण्यांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजर असतात राजकीय पक्षाच्या होर्डिंग वर त्यांचा मोठ्या आकारामध्ये फोटो असतो सदरचे कात्रण यासोबत जोडत आहोतच पंचायत समितीच्या गेट्स समोर यांचे होर्डिंग्स लागलेले असतात.

याव्यतिरिक्त साखळी पद्धतीच्या योजना व शेअर मार्केट मध्ये अनेक लोकांना ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गुंतवणूक केल्याची खात्रीलायक चर्चा आहे. अद्याप गुंतवणूकदार कोणीही तक्रार केलेली नाही परंतु ‘भविष्यात यांच्या विरोधात तक्रारी होण्याची दाट शक्यता आहे.तरी या शिक्षका विरोधात कसून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी एन. एम न्यूज चे संपादक अशोक पवार व तेज महाराष्ट्र न्युजचे संपादक प्रशांत देशमुख. यांनी जिल्हा मुख्यअधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Views: 172
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भटाणे शिवारात वन्यप्राणीच्या हल्ल्यात शेळ्या व कोंबड्य केले फस्तभटाणे सह परीसरात भितीचे वातावरण. बंदोबस्त करण्याची मागणी

भटाणे शिवारात वन्यप्राणीच्या हल्ल्यात शेळ्या व कोंबड्य केले फस्तभटाणे सह परीसरात भितीचे वातावरण. बंदोबस्त करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)