आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी २, १४,५०० रुपयाची चोरी उघडकीस, सहा गुन्हे केले उघडकीस
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील चोरी प्रकरणी अट्टल चोरटे यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून अनेक चोऱ्या झाल्या आहेत यामध्ये एकूण सहा चोऱ्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पोहेकॉ ठोंबरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली व त्यानंतर झालेल्या चोरीची चकली फिरू लागली
यामध्ये पुढील पोलीस कर्मचाऱ्यांनी एकूण सहा चोऱ्या उघडली सांडल्या यामध्ये पोहेकॉ दादासाहेब ठोंबरे, पोह विजय कदम राजेंद्र कदम ४) पोहेकॉ सोमनाथ पाटील गजानन देशमुख ,विष्णु बोईनवाड साधना शेडगे,जयश्री जाधव ,कुंडलिक घेरडे, दत्तात्रय कांबळे अमोल मोहिते यांचा सहभाग होता.
- कैलास सर्जेराव रणदिवे, वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. फोंडशिरस, ता. माळशिरस जि. सोलापुर २) देवगण बापु ऊर्फ विजय पवार, वय २१ वर्षे, मुळ रा. मापटे मळा, आटपाडी ता. आटपाडी यांच्या कडून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.१,०५,०००/- रु किं च्या अंदाजे सोन्याच्या पाटल्या २) १८,०००/- रु किंमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची एक चैन ६५०० /- रु किंमतीची आडीच ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी ४) ५०,००० /- रू किंमतीची एक काळे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल नं आरजे २३ युएस ८३७७ तिचा चेसीस नं एमबीएलएचएडब्ल्यु १२९एम४ एल१ १७३५ व इंजिन नं एचए ११ इवायएम४ एल० ५२५७ असा असलेली मोटर सायकल ५) १५,०००/- रु ब्लॅक ग्रे रंगाची स्पलेंडर प्लस मो.सा क्र एमएच ११ बीसी ५१४७ तिचा चेसिस नंएमबीएलएचए १०ईझेडबीएचजी३३इंजिननंएचए १०ईएफबीएचजी ३३०२ अशी किमंत ६) २०,००० /- रु एक वनप्लस कंपनीचा मोबाईल नॉर्ड सीई -२ लाईट नावाचे मॉडेल त्यात जिओ कंपनीचे सिमकार्ड नं ८३२९०६२६९१ व व्हीआय कंपनीचे सिम नं ९०९६८३६१८३ असा असा असलेला असा एकूण एकुण २, १४,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की दि. १२.०८.२०२३ रोजी रात्री ०३.३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचे बंद घराचे कडी खिडकीतून कशानेतरी काढुन घरात प्रवेश करुन बेडरुम मध्ये असलेले वरील वर्णनाचे साहित्य चोरुन नेलेबाबत आटपाडी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांना तपासाच्या सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुशंगाने पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती काढुन नमुद गुन्ह्याची चोरी ही देवगण विजय पवार यांने केलेली असुन तो माळशिरस एस.टी. स्टँड येथे असलेची माहिती मिळालेने त्यास माळशिरस येथील स्टँडवरुन पकडुन त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली असुन त्याचेकडुन वरीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
त्याने १ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली असुन पारगांव खंडाळा येथील गोपीचंद विष्णु हर्णे, वय ५० वर्षे, रा. शिवाजी चौक खंडाळा याचीही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली असुन त्यांचेकडुन २ मोटारसायकल हस्तगत केलेल्या आहेत. आरोपी देवगण विजय पवार, वय २१ वर्षे, रा. मापटे मळा, यांने दिघंची येथील फिर्यादी किरण सुखदेव पुसावळे, वय ३२ वर्षे, याचा वरील वर्णनाचा वनप्लस मोबाईल चोरी केल्याची कबुली दिलेली असुन त्याचेकडुन मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आरोपी देवगण बापु ऊर्फ विजय पवार याचेकडुन एकुण ६ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.







