युवा नेते नवनाथ रणदिवे यांच्या मागणीला यश.. प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्याचे आदेश
दिघंची ता.आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधित अधिकारी कर्मचारी यांन निलंबित करून प्राथमिक आरोग्य केंद्राचा भ्रष्टाचार पाठिशी घालणा-या तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाही होणार असल्याची माहिती नवनाथ रणदिवे यांनी दिली.
आलेल्या तक्रारी नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघंची व तालुका आरोग्य अधिकारी पं.स. आटपाडी येथे होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निलंबीत करणेबाबत तक्रार सादर केलेली आहे.
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांना चौकशी करुन दहा दिवसात अहवाल देणेकरिता आदेशीत करण्यात आले आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच चौकशी अहवालात नमूद केलेप्रमाणे संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई प्रस्तावीत केली जाईल.तरी उपोषण मागे घ्यावे असे पत्र नवनाथ रणदिवे यांना दिले आहे.त्यानंतर उपोषण कर्त्यानी उपोषण स्थगित केले अशी माहिती नवनाथ रणदिवे यांनी दिली.







