आटपाडी तालुक्यातील विकास कामासाठी 54 लाखाचा निधी आम्.पडळकर
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील विकास कामासाठी 54 लाखाचा निधी आम. गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.
यामध्ये 25/15 योजनेंतर्गत मासाळवाडी व झरे गावांसाठी 54 लाख रुपयेचां निधी मंजूर झाला असल्याची माहिती आम्. पडळकर यांनी दिली.
मासाळवाडी येथे भोजलिंग मंदिरा समोरील सभामंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये, सिध्दनाथ मंदिरा समोरील सभामंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये, झरेतील ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 25 लाख रुपये तर जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधणीसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच बांधकाम सुरू होईल अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली.
झरे येथे ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता.तसेच जेष्ठ नागरिकांनी विरंगुळा केंद्र होण्यासाठी अनेक दिवसापासून पाठपुरावा केला होता .त्यासाठी ही निधी मंजूर झाल्याने जेष्ठ नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







