आटपाडीतील शाळेत विद्यार्थ्याला अमानुष मारहाण…
आत्पडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसापूर्वी बाळेवाडीतील कोळेकरवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ‘गुरुकुल’ नावाने अनेक वर्षापासून नवलौकिक असलेली निवाशी शाळा आहे. या शाळेत फेल झालेल्या शाळेच्या वसतीगृहातील विद्यार्थ्याला काठी, रॉडने बेदम मारहाणीचा प्रकार उजेडात आला आहे. या विद्यार्थाला मारहाण सलग दोन दिवस सुरू होती . हा प्रकार घडत असताना संबंधित शिक्षकांनी रविवारी संबंधित जखमी विद्यार्थ्याच्या पालकांना याबाबतची कल्पना दिल्यानंतर संतप्त पालकांनी पोलीसात धाव घेतली.
निवासी शाळेव्दारे गुरूकुल परंपरेचा दावा करत शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या संकुलात प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयाव्दारे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. येथे निवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतीगृहात आठवीमध्ये चोपडी येथील विद्यार्थ्यांने चुका करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव शिक्षकांना सांगितले, त्याचा राग धरून पाच विद्यार्थ्यांनी ग्रुप करून त्या विद्यार्थ्याला दोन दिवस बेदम मारहाण केली.
काठी, रॉड आणि पाईपने मारहाण केली. याबाबत वाच्यता केल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिली. शिवाय वसतीगृहाच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत नेवुन मारहाण करण्यात आली.तीन दिवसापुर्वी झालेला प्रकार रविवारी सकाळी उजेडात आला. त्यानंतर गुरुकुलच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना माहिती देऊन बोलावून घेतले.
विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीने डोळा, पाठ, डोके, हात, पायासह अनेक ठिकाणी व्रण उमटले आहेत. शरीर काळे-निळे पडल्याने जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप अनावर झाल्याने. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीसात धाव घेतली. शिक्षकांनी याची दखल घेतली नसल्याचे सांगत मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडुन शाळेत दबावतंत्राचा वापर केल्याने दहशतीत असल्याचे नमूद केले.
चौकट
1…आटपाडी तालुक्यातील शिक्षकांच्या वरचा धाक कमी झाला की काय अशी चर्चा नागरिकांतून होत आहे बाळेवाडी कोळेकर वस्ती येथील एका विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मारहाण केली होती हे प्रकरण घडून काही दिवस होत आहेत तोपर्यंतच गुरुकुल नावाने सुरू असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली.
2.. विद्यार्थी म्हणजे कचरा आहे की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षक अनेक वेळा विद्यार्थ्यांना मारतात . विद्यार्थ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे परंतु ती शिक्षा देत असताना त्याला मर्यादा त्यामध्येच शिक्षकांचे अनेक ठिकाणी लागेबांधे आहेत .त्यामुळे यातून ते सहजासहजी बाहेर पडतात . उलट अशाच शिक्षकांना अनेक जण सपोर्ट करतात व त्यांची पाठराखण करतात असे प्रकार थांबावेत अन्यथा शिक्षका ंवरील नागरिकांचा विश्वास संपेल.







