टेंभु उपसा सिंचन योजनेस,तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार – साहेबराव पाटील- (शिवसेना तालुकाप्रमुख)
आटपाडी प्रतिनिधी
टेंभू योजनेच्या 3 री सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेसाठीच्या सर्व पुर्तता पुर्ण झाल्या असल्याने तसेच येत्या 15 दिवसांत मंजुरी मिळणार असल्याची माहीती आमदार अनिल बाबर यांचेकडून मिळाली असून महायुती सरकारकडुन मतदारसंघातील वचित गावासाठी फार मोठी मदत होणार आहे.
टेंभु योजनेसाठी जलसंपदा विभागाकडुन सुप्रमासाठी लागणारी सर्व पुर्तता म्हणजेच सर्वात महत्वाचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची (MWRRA) मंजूरी मिळाली असून वित्त व नियोजन विभागाचीही मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे सुप्रमास मान्यता मिळणेचा अडसर दुर झाली आहे. टेंभू योजनेस दुसरी सुप्रमाची किंमत रु. 4088.94 कोटी इतकी होती.
परंतु मतदारसंघातील अनेक गावे टेंभूच्या लाभक्षेत्रापासुन वंचित होती. त्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मागील सरकारच्या काळापासुन वंचित गावांचा समावेश करण्याची मागणी करीत होते. त्यानुसार वंचित गावासाठी पहिल्यांदा वाढीव 8 TMC पाणी मिळाले. नंतर वंचित गावांचा प्राथमिक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार तृतिय सुप्रमाची किंमत रु. 7370.03 कोटी इतक्या रकमेस मान्यता मिळणेसाठी प्रस्तावित आहे.
यामध्ये मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातील 13 (आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरीखु., राजेवाडी, कुरुंदवाडी, खांजोडवाडी, लिंगीवरे, उंबरगांव, पांढरेवाडी, पुजारवाडी (दि.), पिंपरी बु., विभुतवाडी, गुळेवाडी) खानापूर तालुक्यातील 15 (रेणावी, रेवणगांव, धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखिणवाडी जाधववाडी, घोटी बु., घोटी खु. भडकेवाडी, घाडगेवाडी, बाणुरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी, करंजे, भिकवडी बु.) व तासगांव तालुक्यातील (विसापूर सर्कल) 8 (कचरेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, मांजर्डे(दत्तनगर), पेड, मोराळे) इ. वंचित गावातील क्षेत्रास टेंभू योजनेचे पर्यायाने कृष्णेचे पाणी मिळणार आहे. त्याचा मोठा आनंद होत आहे.
खानापूर तालुक्यातील गावांसाठी टप्पा क्र.६अ व टप्पा क्र.६ब तसेच पळशी उपसा सिंचन योजना, आटपाडी तालुक्यातील गावांसाठी कामथ तलावावरुन ग्रॅव्हीटीने (गुरुत्व/उताराने) तसेच माण खटाव उपसा सिंचन योजनेतून तासगांव तालुक्यासाठी टप्पा क्र.६ ब मधून पाणी देण्याचे नियोजित आहे. त्यामुळे परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सुप्रमा मिळाल्यानंतर लवकरच निवीदा काढून कामास सुरुवात करण्यात येईल.
यासाठी आमदार अनिलभाऊ यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये लक्षवेघी मांडली. व संबंधीत मंत्री महोदयांकडून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत असल्याचा तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे सदरचा पाठपुराव्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सुटत असल्यामुळे सर्व वंचित गावात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.
यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांना महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे आटपाडी तालुका शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव पाटील यांनी माहिती दिली







