कृषी विभागामार्फत दिनांक 8 रोजी चर्चासत्राचे आयोजन… शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे.. तालुका कृषी अधिकारी..मारुती कौलगे
आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत डाळिंब व ऊस पीक व्यवस्थापन, ट्रॅक्टरचे टायर, वाहनांची देखभाल व ज्वारी लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन व चर्चासत्र दिनांक: 8 दिसंबर, 2023 (शुक्रवार) सकाळी 9:30 वाजता आयोजित केले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थीत रहावे असे आव्हान तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे व प्रशांत पाटील यांनी केले आहे.
वरील चर्चा सत्र श्री मंगल कार्यालय, आटपाडी-भिवघाट रोड, बनपूरी फाटा आटपाडी येथे संपन्न होणार आहे .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार ,डॉ.बी.टी.गोरे डाळिंब तज्ञ, फार्म डी.एस.एस, अहमदनगर,प्रशांत कुंभार डाळिंब अन्नद्रव्य व्यवस्थापन ,डॉ. मल्लिकार्जुन कीटकशास्त्र शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर,डॉ. सोमनाथ पोखरे शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर,विजय कुमार सरूर चीफ अग्रोनोमी कोठारी अॅग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड, सुबोध गुप्ता डीजीएम मार्केटिंग, धानुका एग्रीटेक लिमिटेड,फरहान सिद्दीकी मैनेजर मार्केटिंग (बिटीएल) सिएट इस्पेसलिटी, सिएट लिमिटेड, सतीश पाटिल जनरल मॅनेजर सांगली,उपविभागीय कृषि अधिकारी, विटा,तालुका कृषी अधिकारी, आटपाडी हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान कृषि विभाामार्फत करण्यात आले आहे.







