इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया वेलफेअर असोसिएशन च्या वतीने विविध मान्यवरांचा आटपाडी भूषण पुरस्काराणे होणार सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता.आटपाडी येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आटपाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी न्यायालयाचे न्यायाधीश विनायक पाटील व टेंगसे तसेच आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. विनय पत्की (सुविधा हॉस्पिटल, आटपाडी), डॉ. सतिश देशमुख (वैद्यकिय अधिकारी प्रा.रु. आटपाडी), डॉ. गजानन मोरे (सरस्वती हॉस्पिटल, दिघंची) ॲड.धनंजय पाटील (प्रसिद्ध कायदेतज्ञ)सौ. वृषाली पाटील (प्रथमलोकनियुक्त सरपंच, आटपाडी) हणमंतराव देशमुख (माजी सरपंच, दिघंची). शरद मेमाणे (पोलिस निरीक्षक, आटपाडी), युनुस शेख (सरपंच, धावडवाडी, शासन आपल्या दारी), ऋषिकेश साळुंखे (सामाजिक कार्यकर्ते) श्री. अरविंद चांडवले (साहित्य व सामाजिक), हैबतराव पावणे (कार्यकर्ते ),बाळासोा मोटे (सामाजिक कार्यकर्ते, अर्जुन पुजारी (सामाजिक कार्यकर्ते)
या मान्यवरांचा आटपाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया वेलफेअर असोसिएशनचे अशोक पवार व प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.







