“नेत्यांच्या पक्षीय अदलाबदलीच्या सावटाखाली लोकसभेचे काऊनडाऊन सुरु.”
‘नंदुरबार, लोकसभेसाठी नवीन चेहरा की जुन्यानांच संधी,उमेदवारांची चाचपणी सुरु.’
त-हाडी :- तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांना सारून भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी वापरलेल्या धक्कातंत्राचे मॉडल महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभेसाठी लागू होण्याची शक्यता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मिळत असल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही भाजपाकडून उमेदवार बदलीचे संकेत मिळत असून नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात असतांना महाराष्ट्रात झालेल्या राजकीय पक्षातील उलथापालथीचा फटका नेमका कोणत्या पक्षाला कसा बसणार याची गोळाबेरीजच सध्या होत नसल्यामुळे नवीन चेहरा की तेच उमेदवार याबाबतही शांसकता निर्माण झाली आहे.
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजणार आहे.खान्देशची नाळ मध्य प्रदेश व गुजरात. राज्यला जोडणारा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हॅट्रिक साधून असल्यामुळे भाजपासाठी बालेकिल्ला समजला जातो.युती व आघाड्यांच्या काळात काँग्रेसने सुरुवातीच्या दोन पंचवार्षिक मध्ये आपल्या उमेदवारांना अजमावूनही पदरी निराशा मिळाल्याने २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहाल केल्यानंतरही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.विशेष म्हणजे भाजपाच्या डॉ हीना गावित यांनी लगातार दोन वेळेस प्रतिस्पर्धी उमेदवाराला तीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत करून दिल्लीची वारी साधली होती.यावेळेस मात्र परिस्थिती खूप बदलली आहे.युती आणि आघाडीत सद्या बिघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत दोन गट पडल्याने शिंदे गट व अजित पवार गट भाजपासोबतच्या युतीत तर उदधव ठाकरे व शरद पवार गट काँग्रेसच्या आघाडीसोबत असले तरी आगामी जागा वाटपाच्या तिढ्यात युती व आघाडीसोबत कसे एकमेकांना गुंफले जाणार व कुणाला कोणती जागा मिळणार यावरही या मतदारसंघात बरेच काही अवलंबून असणार आहे.
“भाजपचे प्राबल्य पण मतदारात नाराजी.”
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार, नवापूर, शिरपुर, शहादा धडगाव व अक्कलकुवा या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नवापूर व धडगाव वगळता चार विधानसभा मतदारसंघात भाजप – शिंदे गटाचे प्राबल्य दिसून येत आहे.मात्र वाढत्या महागाईने सोबतच शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात मतदारात नाराजीचा सूर उमटत असल्यामुळे भाजपा उमेदवाराला त्याचा फटका बसणार आहे.
“राजकीय पक्षांची किमत घटतेय..लोकसभेत उमेदवाराच्या स्वच्छ प्रतिमेचा करिष्मा चालणार..”
मागील गेल्या काही काळापासून राजकीय पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार त्यांच्याच पक्षातून सोडचिट्ठी देण्याचे तंत्र अवलंबविले आहे.हा प्रकार आज रोजी जागृत झालेल्या मतदारांना मुळीच पटणारा नसून त्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकातून दिसणार आहेत.याच प्रकारामुळे राजकीय पक्षांची किमत दिवसेंदिवस कमी होत असून पक्षाऐवजी स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हा करिष्मा या निवडणुकीत जास्त महत्वाचा असणार आहे.
चौकट
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार नांव
डॉ हीना विजयकुमर गावित- (विद्यामान खासदार)
डॉ विशाल कुंवर सिंह वळवी- (कुंवर सिंह वळवी यांचे सुपुत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते)
सुहास नाईक (जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदुरबार)
डॉ जितेंद्र ठाकुर-
के,सी,पाडवी-.( विद्यामान आमदार धडगाव)
कुणाल बपेसिंग वसावे-(माजी नगराध्यक्ष नंदुरबार)
रंजनी शिरीष नाईक- (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष)
सिमा वळवी नाईक – (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदुरबार)
डॉ सुहास नटावदकर – (भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते)
डॉ सिंमिदिती नटावदकर (डॉ नटावदकर यांची मुलगी)
राजेश पाडवी (विद्यामान आमदार शहादा- तळोदा)
डॉ राजेंद्र भारूड (माजी जिल्हाधिकारी नंदुरबार)
चौकट
शिरपूर तालुक्यात विधानपरिषद सदस्य आमदार अमरिशभाई पटेल हे ज्यांना उमेदवारी जाहीर करतील तेचं नंदुरबार लोकसभा मतदारसंघ उमेदवारी करू शकतो
कारण आ अमरिशभाई
२०१९ निवडणुकीत शिरपूर तालुक्यातील डॉ हीना गावित यांनी मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली होती





