आदिवासी भागातील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार- अमरिशभाई पटेल
व्यंकटेश क्रीडा महोत्सवाला झाला प्रारंभ
त-हाडी (प्रतिनिधी) कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांनी व्यंकटेश क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली तेव्हापासून या महोत्सवात मी येत आहे.मी खेळात भाग घेतला नाही,म्हणून खेळाकडे माझे विशेष लक्ष आहे.आपल्या भागातील मुले राष्ट्रीय पातळीवर गेले पाहिजेत.म्हणून मी देखील प्रयत्न करित आहे.
शिक्षणाबरोबर खेळात भाग घेतल्यास जीवनात व्यक्ती पुढे जातो.अनेक गुण आपल्या व्यक्तीमत्वात निर्माण होतात.आपल्या भागातील खेळाडू राज्य,देशपातळीवर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे.मी क्रिडामंत्री असतांना आपल्या आदिवासी भागातील अनेक खेळाडुंना विदेशात खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.खेळण्यामुळे आरोग्य चांगले राहते.आदिवासी भागात चांगले खेळाडु असल्यास त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी व तुषारभाऊ अवश्य प्रयत्न करु.चांगल्या खेळासाठी खेळाडुंनी कठोर परिश्रम घ्यावे असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री आ.अमरीशभाई पटेल यांनी व्यंकटेश २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शिरपूर येथील किसान विद्या.प्रसारक संस्था संचलित व्यंकटेश क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले. शिरपूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रिडा मैदानावर व्यंकटेश क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन खा.डाॅ.हिनाताई गावित यांच्या शुभहस्ते झाले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण मंत्री व शिरपूर तालुक्याचे विकासरत्न आमदार अमरीशभाई पटेल होते तसेच,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी,आ.काशिराम पावरा,
धुळे जि.प.अध्यक्ष देवेंद्र पाटील,किसान विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,
भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई पावरा,उपसभापती विजय बागुल,
संस्थेचे सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,
भाजपाचे शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी,
जि.प.सभापती कैलास पावरा,मा.जि.प.सभापती वसंत पावरा,रमण पावरा,
जि.प सदस्या जताबाई पावरा,जि.प.मा.सभापती सखुबाई पारधी,मा.पं.स.सभापती सत्तारसिंग पावरा,मा.जि.प.सदस्या सिमाताई रंधे,मा.पं.स.सभापती उत्तम पावरा,प्रशांत पाटील नंदुरबार,मिलिंद पाटील,भरत पाटील,यतीश सोनवणे
व्यंकटेश क्रिडा मंडळाचे सचिव रोहित रंधे,धुळे-नंदुरबार ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे,बोराडीचे सरपंच सुकदेव भिल,
संस्थेचे विश्वस्त आनंदसिंग राऊळ,डाॅ.जितेंद्र चित्ते,शामकांत पाटील,संजय गुजर,उद्योजक हर्षवर्धन रंधे,संचालिका हर्षाली रंधे,प्राचार्या सारिका रंधे,विद्या रंधे,रोहीणी रंधे,
तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच,उपसरपंच,विविध पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सुरुवातीस सर्व खेळाडुंनी शपथ घेऊन मानवंदना दिली व संचलन झाले.के.व्ही.टी.आर.सी.बी.एस.ई.स्कूल,शिरपूर,सौ.सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय,डाॅ.व्ही.व्ही.रंधे इंग्लिश मेडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी नृत्यातुन खेळाचा संदेश दिला.
प्रास्ताविकात डाॅ.तुषार रंधे म्हणाले की,
आरोग्यासाठी या व्यंकटेश मेळाव्याचे नियोजन आम्ही करीत असतो.व्यंकटेश मेळाव्यानेच आम्ही नवीन वर्षाला प्रारंभ करत असतो. आपणा सर्वांचे नववर्ष आरोग्यदायी झाले पाहिजे .
आपल्या सगळ्यांना वर्षभरासाठीची एनर्जी मिळायला हवी.यासाठी आम्ही व्यंकटेश मेळावा भरवीत असतो.आजपर्यंत आम्ही व्यंकटेश मेळाव्याचा पन्नास वर्षाचा प्रवास पूर्ण करीत आणला आहे.वर्षभराचा उत्साह व्यंकटेश महोत्सवातुन मधून आम्हाला मिळतो असे प्रतिपादन केले.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी सांगितले की,आपल्यातील क्रिडा कौशल्य महत्वाचे असुन,सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत,गेल्या 50 वर्षांची परंपरा असलेला हा क्रिडामहोत्सव अतिशय कौतुकास्पद आहे. खेळ,व्यायामामुळे आपले आरोग्य चांगले राहते.हॅमर थ्रो मध्ये मी राज्य पातळीवर गेलो होतो.जीवनात खेळाला खुप महत्व आहे.यासाठी नियमित सराव करावा.2014 नंतर खेळाला सरकारने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
खा.हिनाताई गावित यांनी सांगितले की,माझा 2024 चा हा पहिला कार्यक्रम असुन यामुळे मला वर्षभर ऊर्जा मिळणार आहे.माझे वडील ना. डाॅ.विजयकुमार गावीत हे अतिशय चांगले खेळाडु व कोच होते.मी सुद्धा अॅथेलॅटिक्सची चांगली खेळाडू आहे.धावणे,थाळीफेक,गोळाफेक,उंचउडीची मला आवड होती. येथील वातावरण पाहून खूप आनंद झाला.या महोत्सवामुळे या ग्रामीण भागातील खेळाडुंना चांगला फायदा होत आहे.आपल्या भागातील खेळाडू,राष्ट्रीय,एशियन स्पर्धांपर्यंत जात आहेत.सर्वात चांगले खेळाडू ग्रामीण भागातच तयार होतात.खेळामुळे खेळाडूंमध्ये शिस्त,जोश,निर्माण होतो.खेळात जिंकणे-पराभव होत असते.त्यातुन नवीन प्रेरणा घ्यावी.कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवास सुरुवात झाली असुन,खेळाडूंनी यातुन आपले,देशाचे नाव पुढे घेऊन जावे असे आवाहन केले.
व्यंकटेश 2024 च्या उपस्थित मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्हाॅलिबाॅल,खो-खो च्या सामन्यांचे उद्घाटन केले.
या क्रिडा स्पर्धेसाठी कब्बडी,खो-खो,व्हाॅलिबाॅल,क्रिकेट या सांघिक खेळासाठी प्राथमिक गटातील १२ संघ, माध्यमिक गटातील २३ संघ,जूनियर गटातील १४ संघ व सीनियर गटातील ७ संघ असे एकुण ५६ संघांनी तसेच थाळीफेक,गोळाफेक,भालाफेक,धावणे,रिले,बुद्धीबळ,कॅरम,बॅडमिंटन,बाॅक्सिंग,या वैयक्तिक स्पर्धा असुन, या महोत्सवात सुमारे 3800 खेळाडु मुला मुलींनी घेतला आहे.सदरचा क्रीडा महोत्सव तीन दिवस चालणार असून तिसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील,के.डी.बच्छाव,सिताराम माळी,भैय्या माळी,प्राचार्य एस.एस.राजपुत,विविध शाखांचे शाखाप्रमुख,क्रिडाशिक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.सुत्रसंचालन श्रेया अग्रवाल व शितल खैरे यांनी केले.





