फत्तेपूर फाॅ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
त-हाडी
जिल्हा परिषद शाळा फत्तेपूर ( फॉ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती .बालिका दिवस उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर
येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने प्रतिमेचे पुजन सुहानी चव्हाण . दिपाली पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी , शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भामरे ह्यानी सावित्रीबाई फुले ह्याचे जीवन चरित्र परिचय मुलांना करुन देण्यात आला
भाषणातून सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होऊन गेल्यामुळे आजही प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक अशी स्त्रियांची प्रगती दिसून येते. ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे जर त्या नसत्या तर आजही स्त्रिया या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या सावित्रीबाई फुले होत्या म्हणून तर आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन लढताना दिसत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनपट उभा केला. बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सुहानी पावरा मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. समारोप प्रसंगी लुकेश गावीत सरानी यांनी सर्वांचे आभार मानले*.







