गॅस सिलेंडरचा तुटवडा.पुरवठा विभागाच्या प्रयत्नाने सिलेंडर उपलब्ध… नागरिकांची पळापळी थांबली
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते पण महसूल विभागाच्या प्रयत्नाने गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की खाजगी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरने संप केल्याने गॅस तुटवडा झाला असल्याची माहिती गॅस एजन्सी कडून मिळाली होती. सरासरी शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा घरोघरी गॅस चा वापर होत आहे सध्या चुलीवरचा स्वयंपाक कुठेतरी पाहायला मिळतो त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करायची लागलेली सवय आणि गॅसचा तुटवडा झाल्याने महिला त्रस्त झाले आहेत
तालुक्यामध्ये इंडियन भारत एचपी या कंपनीच्या गॅस एजन्सी आहेत. या गॅस एजन्सी मध्ये तुटवडा झाल्याने नागरिकांना गावोगावी गॅस डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या गावोगावी न गेल्याने नागरिकांना गॅस सिलेंडर मिळाला नाही त्यामुळे गॅस मिळण्यासाठी अनेकांची पळापळी सुरू झाली आहे.
याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना गॅस तुटवडा संदर्भात माहिती दिली त्यानंतर त्यांनी पुरवठा शाखेचे दादासाहेब पुकळे यांना बोलावून घेऊन माहिती घेण्याचे सांगितले .होते तर सायंकाळपर्यंत गॅस एजन्सी मध्ये उपलब्ध झाल्याची माहित पुरवठा शाखेचे शिंगाडे यांनी माहिती दिली.







