झरे परिसरातील गावठाण भागातील ट्रान्सफॉर्म मधील फुजांची चोरी.. ग्रामस्थ संतप्त
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी परिसरामध्ये झरे ,पारेकरवाडी ,जांभुळणी ,विभूतवाडी या गावातील गावठाण ट्रान्सफॉर्म मधील फुज ची झाली आहे. अनेक दिवसापासून फुजाच्या चोऱ्या होत आहेत याबाबत ग्रामस्थ व महावितरणचे अधिकारी संतप्त झाले आहेत.
रात्रीच्या वेळेला कोणीतरी अज्ञात चोरटा फुजांची चोरी करत आहे. या फुजांना बाजारामध्ये चांगल्या पद्धतीची किंमत येते. कारण ट्रान्सफॉर्म म्हटल्यानंतर त्यामध्ये मोठ्या फुजा असतात त्यामुळे त्याचे बऱ्यापैकी पैसे होतात.
अशा प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. चक्कीवरील दळण दळणे पाणीपुरवठा विस्कळीत होणे. अशा अडचणीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. तसेच एक तर दुष्काळ आहे त्यातच विहिरीत थोडेफार पाणी ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांना पिकांना पाणी देण्याची अडचण होत आहे .
वाडी वस्तीवरील लोकांना जनावरांना पाणी पाजण्याची सुद्धा अडचण भासत आहे.तसेच गावात घराघरांमध्ये लाईट नसते त्यामुळे सर्वच कामे खोळंबली जात आहेत
तरी अशा चोराचा शोध लावून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.







