ॲड.वैभवदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झरेत भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया..
आटपाडी प्रतिनिधी
खानापूर मतदारसंघातील युवानेते व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभवदादा पाटील यांचे वाढदिवसानिमित्त टेके आय क्लिनिक, सांगली यांचे संयोजनाने भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत नेत्र शस्त्रक्रिया व उपचार होणार आहेत तरी जास्तीत आहे गरजूंनी लाभ घ्यावा असे आव्हान संचालक व युवा नेते सचिन राजमाने यांनी केले आहे.
तसेच डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. पडद्याच्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया (रेटीना) पडदा निसटणे. डायबेटीकमुळे (मधुमेह) पडद्यावर झालेल्या दोषासाठी पडद्याची शस्त्रक्रिया. डायबेटीक रेटिनापॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया. तिरळेपणावर उपचार बुबुळांच्या शस्त्रक्रिया पापणीचे आजार लासरुची तपासणी. बुबुळ बदलणे डोळ्यातील वाढलेले मांस काढणे.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना सर्व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत. होणार आहे.तसेच शिबिराच्या दिवशी मोतिबिंदू रुग्णांना श्री टेके आय क्लिनिक, सांगली येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येईल. पेशंटना येण्या-जाण्याची व जेवणाची सुविधा मोफत केली आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक विजय अनुसे (चिटणीस, आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रस पार्टी, आटपाडी),सचिन राजमाने (संचालक, विटा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, झरे) नितिन वाघमारे श्री. सुखदेव खताळ. यांनी केले आहे.
सोमवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ३.च्या दरम्याने श्री महादेव मंदिर, झरे, ता. आटपाडी येथे आयोजन केले आहे.







